(चिखली मन्सूर शहा.) पत्रकारांची देशातील सर्वात मोठी संघटना म्हणून देशभर आपली वेगळी ओळख निर्माण करणारी वाईस ऑफ मीडिया ही संघटना आता खऱ्या अर्थाने पत्रकारांची आवाज बनली असून. पत्रकार व त्याच्या कुटुंबासाठी विविध कल्याणकारी योजना थेट कुर्ती कार्यक्रम राबवणाऱ्या या संघटनेला आता पत्रकारांच्या न्याय व हक्कासाठी आंदोलनाच्या माध्यमातून शासनाचे लक्ष वेधले आहे .आज ११ मे २०२३ रोजी राज्यभर धरणे आंदोलन करण्यात आले. असून त्या अनुषंगाने बुलढाणा जिल्ह्यात देखील सर्व तालुक्यातील धरणे आंदोलन करून निवेदन देण्यात आले असून आज , चिखली येथे व्हाईस ऑफ मीडिया राज्य संघटनेचे संघटक मा. सुधीर जी, चेकें के मंगेश पळसकर ,गोपाल तुपकर, इसब शेख, यांच्या नेतृत्वात चिखली तहसीलदार यांना यासंबंधी निवेदन देण्यात आले .सकाळी ११ वाजे पासून,धरणे आंदोलन सुरुवात करून पत्रकारांसाठी स्वतंत्र कल्याणकारी मंडळ स्थापन करून त्याला भरून निधी द्यावा ,पत्रकारितेत पाच वर्ष पूर्ण केलेल्या पत्रकारांना सरसकट अधिस्वीकृत पत्रिका देण्यात यावी, वृत्तपत्रांना सध्या जाहिरात वर लागू असलेल्या जीएसटी रद्द करावा. पत्रकारांना घरासाठी विशेष बाब म्हणून शासकीय भूखंड देण्याचा निर्णय घ्यावा कोरोनात जीव, गमावलेल्या पत्रकारांना फ्रंट लाईन वर्कर, चा दर्जा देण्यात यावा, पत्रकार कुटुंबाची पुनर्वसन करावे, शासनाने सध्या जाहिरात धोरण क वर्ग दैनिक लघु दैनिक यांना मारक आहे लघु दैनिक वर्ग ब प्रमाने जाहिरात देण्यात यावी व साप्ताहिकांनाही जाहिरात देण्यात यावी. अशा विविध मागण्यासाठी चिखली येथे धरणे आंदोलन करून तहसीलदार चिखली यांना यासंबंधी निवेदन देण्यात आले यावेळी संपूर्ण चिखली व चिखली तालुक्यातील पत्रकार बांधव आवर्जून उपस्थित होते.
Users Today : 20