अखेर डोणगांव ग्रामपंचायत सचिव रिंढे यांची खातेनिहाय चौकशी सुरु : डोणगांव सचिव सचिन रिंढे यांचा तडाफडकी प्राभार काढुन उचलबांगडी

Khozmaster
3 Min Read

डोणगांव ग्रामपंचायत येथील सचिवांनी विविध विकास कामामध्ये खूप अनियमितता करून आर्थिक भ्रष्टाचार केला असल्याचे निवेदनात म्हटले आहे त्यामध्ये प्रामुख्याने गावातील मुख्य व इतर रस्त्याची नाली बांधकाम न करता सदर कामाचे देयक काढले यामध्ये कनिष्ठ अभियंता श्री चव्हाण यांच्या संगनमताने खोटी एम.बी.सी.सी. तयार करून सदर देयक काढले व नाली साफसफाई तसेच इतर सामान्य फंडातील रकमा सुद्धा ह्या इन हॅन्ड ठेवून मनमानीपणे अनधिकृत पणे खर्च केला असून त्याचा ताळमेळ नसून बऱ्याच रकमा ह्या तफावतीमध्ये आढळून येतात तसेच अपंगावरील ५% टक्के निधी खर्च करणे बंधनकारक असताना देखील तो खर्च करण्यात आला नाही वरिष्ठाच्या आदेशाचे पालन करण्यात आलेले नाही तसेच गावातील विकास आराखड्यातील बंधित व अबंधित निधी त्याच बाबीवर खर्च करणे अपेक्षित असते तरीसुद्धा त्या ठिकाणी खर्च करण्यात आला नाही व विकास आराखड्यातील बऱ्याच विकासात्मक बाबी वगळून इतर कामे करण्यात आली सोयीनुसार खर्च करण्यात आला तसेच प्रस्तावित विकासा आराखड्यानुसार कामे करण्यात आलेले नाहीत.ग्रामपंचायतने घेतलेल्या विविध मासिक ठरावांची अमलबजावनी केलीली नाही.या सर्व कामाची चौकशी समिती नेमून बाबनिहाय चौकशी करावी तसेच सदर सचिव यांना चुकीच्या पद्धतीने अतिरिक्त प्रभार डोणगाव येथे देण्यात आला तो काढावा आणि सदर सचिव डोणगाव कार्यालयात बऱ्याच वेळा गैरहजर असतात आपल्या पदाचा दुरुपयोग करून कर्तव्यात कसूर करणे वरिष्ठाच्या आदेशाचे पालन न करणे आणि ते ग्रामसेवक असून त्यांच्याकडे ग्रामविकास अधिकारी याचा पदभार देणे हे नियमबाह्य असून वरिष्ठांनी याची सुद्धा चौकशी करावी तसेच मुख्यालयी हजर न राहणे कामाचे दिवस न ठरवणे माहिती अधिकार अधिनियम 2005 चा फलक न लावणे नागरिकांना वेळेवर दाखले न देणे सामान्य नागरिकांशी उद्धटपणे वागणे अशा विविध तत्सम तक्रारी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या हेल्पलाईन सेंटरकडे प्राप्त झाल्या त्यानुसार स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष डॉ. ज्ञानेश्वर टाले यांनी मुद्देनिहाय व्हिडिओ चित्रीकरण करून चौकशी समिती नेमुन निपक्षपणे चौकशी करून फौजदारी गुन्हा दाखल करावा व त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई प्रस्तावित करावी तसेच त्यांची खातेनिहाय चौकशी करून पुढील प्रशासकीय कार्यवासाठी प्रस्ताव वरीष्ठाकडे पाठवण्यात यावा अशी मागणी गटविकास अधिकारी पं.स.मेहकर व मुख्य कार्यकारी अधिकारी बुलढाणा तसेच जिल्हाधिकारी बुलढाणा यांना दिलेल्या निवेदनात केली असून कारवाई न झाल्यास स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने जिल्हा परिषद मु.का.अ. किंवा गटविकास अधिकारी पंचायत समिती मेहकर यांच्या दालनात अन्यथा स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने मुक्काम आंदोलन करण्यात येईल असा इशारा जिल्हा प्रशासन तसेच पंचायत समिती प्रशासनाला देताच.प्रशासन अॕक्शन मोडवर त्यामुळे दि. ९/५/२०२३ रोजी सहाय्यक गटविकास अधिकारी श्री सुरडकर,विस्तार अधिकारी पंचायत श्री गवई,विस्तार अधिकारी सांख्यकी श्री जाधव क.अभियंता श्री चव्हाण डोणगांव ग्रामपंचायत ला ५ तास ठान मांडुन चौकशी करत होते.अखेर दि.१० /५/ २०२३ ला सदर वादग्रस्त सचिव रिंढे यांचा पदभार काढुन घेतला. यावेळी स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष डाॕ.ज्ञानेश्वर टाले,देवेंन्द्र आखाडे,वैभव आखाडे,मिनेश बाजड राजु पळसकर, अमोल वाघमारे, जावेद खाॕ भोले खाॕ ,दिपक बनसोडे सह पदाधिकारी व पञकार उपस्थित होते.

 

0 9 3 7 6 2
Users Today : 20
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *