प्रतिनिधी मैनोदिन सौदागर निगंनुर : –
निंगनुर ग्राम पंचायत अंतर्गत कारभाराबाबत माहिती अधिकाराअंतर्गत माहिती मागवित असल्यामुळे चिडलेल्या उपसरपंच महिलेच्या पतीने दिलेल्या चिथावणीवरून तिच्या मुलांनी व दोन नातेवाईकांनी दिवसाढवळ्या तलवारीने हल्ला गावातील नागरिक फारूख खाँ शाब्बासखान व मुतालिबखाँन अशरफखाँन यांच्यावर प्राणघातक हल्ला करून गंभीर जखमी केले आहे . फारूखखान यांच्या तक्रारीवरून बिटरगांव पोलीसांनी उपसरपंच महिलेच्या पतीसह 6 जणांविरुद्ध विविध कलमान्वये गंभीर गुन्हे दाखल केले आहेत .
निंगनुर येथील ग्राम पंचायत मध्ये माहिती अधिकार अधिनियमनानुसार माहितीचा अर्ज का टाकला असे म्हणून चिडलेला उपसरपंच महिलेच्या पतीने माहिती अधिकार अर्ज करणाऱ्यांना गाडीतील तलवारीने कापून टाका अशी चिथावणी देऊन ग्रामपंचायत कार्यालयाजवळ आलेल्या फिर्यादी फारूखखान शाबासखान याचे वर हल्ला करण्यास प्रवृत्त केले . त्याच्या चिथावणीवरून आरोपी साजिदखान वलीउल्लाखान , सद्दाम खान वल्ली उल्ला , इबादखान वलीउल्ला , इम्रानखान वलीउल्ला , वलीउल्ला खान अब्दुल्ला’ राजिकखान कलीमखान यांच्या विरुद्ध – 3o7, 294 , 143′ 144 , 147, 148, 149, 109 , भादंवि तसेच शस्त्र अधिनियम 4 , 25 नुसार 6आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे .ठाणेदार प्रताब भोस यांच्या मार्गदर्शना खाली पुढील तपास बिटरगांव उपनिरीक्षक कपिल मस्के व पोलीस करीत आहे .
Users Today : 20