अकोट प्रतिनिधी विशाल गवई
श्रध्देय अॅड बाळासाहेब आंबेडकर यांच्या वाढदिवसानिमित्त अकोला जिल्ह्याचे आराध्य दैवत श्री राज राजेश्वर मंदिरात बहुजनांचे दिपस्तंभ माजी खासदार श्रध्देय अॅड बाळासाहेब आंबेडकर यांना दिर्घायुष्य लाभावे म्हणून ओबीसी महासंघ महाराष्ट्र प्रदेश व अत्यल्प समाज संघटना वाडेगांव यांच्यावतीने दुग्धाभिषेक व महापूजा करण्यात आली यासोबतच श्रध्देय अॅड बाळासाहेब आंबेडकर यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने १०० किलो मोतीचुर लड्डूचे वाटप करण्यात आले. ह्यावेळी अत्यल्प समाज संघटना वाडेगांवचे अध्यक्ष गोपाल राऊत, ओबीसी महासंघ महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष बालमुकुंद भिरड, ओबीसी महासंघ महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष अॅड संतोष राहाटे, नगरसेविका किरणताई बोराखडे, व्यापारी नेता मनोहर पंजवानी, अकोला पंचायत समिती उपसभापती अजय शेगावकर, राहुलजी अहिरे, प्रसिद्धी प्रमुख विकास सदांशिव, आशु वानखडे, विजयाताई बालमुकुंद भिरड,तेजस्विनी संतोष राहाटे, रामकृष्ण सोनटक्के, गोपाल भाकरे, बाळापूर कृ. उ. बा. समीतीचे संचालक तथा माजी उपसभापती धनंजय दांदळे अमोल कलोरे, प्रा. सुरेश मोरे, डॉ. सुनिल शिराळे, आशिष टेकांडे , सुजित तेलगोटे, कु. क्षितीजा विकास सदांशिव यांच्यासह आदी उपस्थित होते.
Users Today : 20