बुलडाणा, दि. 12 : केंद्रीय उच्च माध्यमिक शिक्षा बोर्ड (सीबीएसई) परीक्षा 2023 मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षेचा 100 टक्के निकाल लागला आहे. उत्कृष्ट निकालाची परंपरा विद्यालयाने कायम राखलेली असून त्यामध्ये दहावीचे 71 पैकी 71 आणि बारावीचे 73 पैकी 73 विद्यार्थी प्राविण्यासह उत्तीर्ण झाले आहेत.
बारावी विज्ञान या शाखेमधून 38 विद्यार्थी परीक्षेला बसलेले होते. ते सर्व विद्यार्थी प्रथम श्रेणी मध्ये उत्तीर्ण झाले आहेत. यामध्ये प्रथम प्रज्वल राउत 91.60 टक्के, द्वितीय गौरव मगर 89.40 टक्के, तृतीय विवेक राजगुरु 87.80 टक्के प्राप्त केले
बारावी कला शाखेतून 35 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. सर्वच्या सर्व विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झालेले आहेत. प्रथम संकेत कुशवाह 92 टक्के, द्वितीय समृध्दी धामनकर 91.20 टक्के, तृतीय लकी ठाकरे 90.20 प्राप्त केले.
इयत्ता दहावीमधून 71 विद्यार्थी परीक्षेला बसले. सर्व विद्यार्थी उत्तीर्ण होऊन सर्व 71 विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत. प्रथम साक्षी दिवनाले 96.20 टक्के, द्वितीय सृष्टी भालतडक 95.60 टक्के, आदित्य भिवगडे 95.60 टक्के, तसेच अभिषेक तुरुकमाने 95.60 तृतीय समिक्षा देशमुख 95.20 टक्के गुण मिळविले आहे.
विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल विद्यालयाचे प्राचार्य आर. आर. कसर, उपप्राचार्य पी. एन. देशमुख यांनी कौतुक केले आहे.
Users Today : 20