चिखली मन्सूरशहा दै. खोज मास्टर न्यूज.
प्राप्त माहितीनुसार ,शेतात काम करत असताना बिबट्याने अचानक हल्ला करून काम करीत असलेल्या शेतकरी पिता पुत्राला जखमी केल्याची घटना चिखली तालुक्यातील हरणी शिवारात १२ मे रोजी दुपारी १२ वाजेच्या सुमारास घडली असून. त्याबाबत अशी माहिती की हरणी येथील ज्ञानेश्वर कनीराम राठोड यांचे हरनी गावापासून काही अंतरावर लायपेटी नामक शेतात वन्यप्राण्याकडून शेतातील पिकाचे नुकसान होऊ नये यासाठी उपवरुक्त वेळी शेतात तार कंपाऊंड करण्याचे काम पिता-पुत्र करीत होते त्यावेळी बिबट्याने अचानक हल्ला करून ज्ञानेश्वर राठोड व ५२ वर्षे व योगेश ज्ञानेश्वर राठोड व ३० वर्ष दोघांना पंजा मारून जखमी केले. हल्ला करीत असताना बाजूने वीर खोदकाम करणारे मजुर धावत येऊन बिबट्याच्या हल्ल्यात त्या दोघांना सोडवीत प्राथमिक उपचारासाठी उदयनगर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. व प्राथमिक केंद्र त्यांना दोघांना पुढील उपचारासाठी १०८ ॲम्बुलन्सने सामान्य रुग्णालयात बुलढाणा येथे रवाना केले हरणी वैरागड नागझरी झोडगा, आधी गावांना लागुनच ज्ञानगंगा अभयारण्य आहे यातील हिसर पशु बाहेर निघून शेतकऱ्यावर वारंवार हल्ले करता या घटना वाढत आहे. त्याकरिता हारनी येथील जखमी ज्ञानेश्वर राठोड व योगेश राठोड यांना शासनाकडून आर्थिक मदत मिळण्याची मागणी स्थानिकाकडून होत आहे.
Users Today : 20