धामणगाव बडे : प्रतिनिधी -नवाब शेख
धामणगाव बढे येथील सरपंच पति अलिम कुरेशी यांनी आज रोजी मुंबई येथे “ग्रामविकास व पंचायत राज,वैद्यकीय शिक्षण क्रीडा व युवक कल्याण मंत्री महा.राज्य मा.श्री.गिरीश महाजन यांना भेट देऊन धामणगाव बढे येथील लोकांच्या काही मागण्या पूर्ण व्हावे या संदर्भात चर्चा केली,धामणगाव बढे येथील ग्राम रुग्णालय तसेच अल्पसंख्याक घरकुल या विषयावर चर्चा करण्यात आली,तरी ग्रामविकास मंत्री मा.श्री.गिरीश महाजन साहेब यांच्या संबधित विभागात मंत्री महोदयांनी शिफारस पत्र पाठवले आहे,धामणगाव बढे येथे ग्रामीण रुग्णालय लवकरच चालू होणार आहे अशी माहिती पण सरपंचपति अलिम कुरेशी यांनी दिली आहे,तसेच पूर्ण महाराष्ट्रातल्या अल्पसंख्यांक घरकुल च्या विषयावर ही चर्चा करून तात्काळ पत्र पाठविण्यात आले आहे. विकासपुरुष सरपंचपति अलिम कुरेशी यांनी आता पर्यंत गावातल्या वार्डातील रस्ते नाली भूमिगत गटार तसेच पाणी ची टाकी पाईपलाईन व इतर अनेक विकास काम करून गावाला सुजलाम सुफलाम करण्याचा प्रयत्न यांनी केला आहे, नुकतेच सांडपाणी घानकचरा व्यवस्थापन कामाला सुरुवात केली आहे ,तसेच धर्मवीर आमदार मा.संजुभाऊ गायकवाड यांच्या शिफारशी ने सुध्दा धामणगाव बढे या गावात अल्पसंख्यांक समाजा करिता मोठाच 45 लक्ष रुपयांचा शादी खाना उभारणार आहे,तसेच धनगर समाजा करिता सभा मंडप चा काम केले,तसेच गजानन नगरीत लवकर 30 लक्ष रुपयांचा सभा मंडप चा काम चालू होणार..! असे विविध छत्ररात विकासपुरुष सरपंचपति अलीम कुरेशी यांनी केले,आता असं वाटते की सरपंचपति अलिम कुरेशी यांच्या प्रयत्नांने या कामाला लवकरच मिळणार यश..! विकासपुरुष सरपंचपति अलिम कुरेशी यांनी आता पर्यत गावाचं भरपूर विकास करून ठेवलेले आहे ,असा हा दमदार,तडफदार,हुशार,भाष्यकार, समाजसेवक युवा नेतृत्व अलिम कुरेशी आपल्या कामामुळे ओळखल्या जाणारे एकमेव लोकप्रिय सरपंचपति,मागे ही अलिम कुरेशी यांनी गावातले काही मागण्या धर्मवीर आमदार संजुभाऊ गायकवाड यांच्याकडे केले होते,तरी आमदार साहेबांच्या प्रयत्नाने धामणगाव बढे इथले भरपूर कामे झालेले आहे,सरपंचपति अलिम कुरेशी यांच्या कामेला सलाम,व राजकिय,सामाजिक,तसेच विकासकामे बद्दल पुढील वाटचालीस अभिनंदन….!
Users Today : 20