सिंदखेड राजात पत्रकारांच्या न्याय मागणीसाठी उपविभागीय अधिकारी यांना निवेदन

Khozmaster
1 Min Read

सिंदखेड राजा सुरेश हुसे

पत्रकारांच्या हिताच्या विविध मागण्यांसंदर्भात व्हॉईस ऑफ मीडिया सिंदखेड राजा तालुक्याच्या वतीने उपविभागीय कार्यालया समोर घोषणाबाजी करून उपविभागीय अधिकारी यांना निवेदन देण्यात आले

वाईस ऑफ इंडिया तालुका अध्यक्ष नंदू वाघमारे कार्याध्यक्ष भगवान साळवे ,मुकुंद पाठक ,छगन झोरे गजानन काळूसे सुरेश हुसे इसाक कुरेशी बाळासाहेब भोसले अफरोज शेख आदींनी विभागीय कार्यालयात उपविभागीय अधिकारी यांना निवेदन दिले असून सदर निवेदन कार्यालयाच्या वतीने कर्मचारी शिवाजी पापुलवार यांनी स्वीकारले

दिलेल्या निवेदनात पत्रकारांसाठी स्वतंत्र कल्याणकारी महामंडळ स्थापन करुन त्याला भरीव निधी द्यावा.

पत्रकारितेत ५ वर्ष पुर्ण केलेल्या पत्रकारांना सरसकट अधिस्वीकृती पत्रिका देण्यात यावी.

वृत्तपत्रांना सध्या जाहिरातीवर लागु असलेला जीएसटी रद्द करावा.

पत्रकारांच्या घरांसाठी म्हणून विशेष बाब म्हणून शासकीय भूखंड देण्याचा निर्णय घ्यावा.

कोरोनात जीव गमावलेला पत्रकारांना फ्रंट लाईन वर्कर चा दर्जा देऊन त्यानुसार मयत पत्रकारांच्या कुटुंबांचे पुनर्वसन करावे.

शासनाचे सध्याचे जाहिरात धोरण क वर्ग दैनिके (लघु दैनिक) यांना मारक आहे. लघु दैनिकांनाही मध्यम (ब वर्ग) दैनिकांइतक्याच जाहिराती देण्यात याव्यात. साप्ताहिकांनाही त्या प्रमाणात जाहिराती द्याव्यात.आदी सह विविध मागण्याचा समावेश आहे

 

0 9 3 7 6 2
Users Today : 20
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *