प्रति चिखली:— चिखली कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये हमाली नसलेल्या बोगस कामगारांचे परवाने चौकशी करून रद्द करा असे निवेदन दि.11 मे रोजी रिपब्लिकन सेनेच्या वतीने चिखली कृषी उत्पन्न बाजार समिती यांना देण्यात आले. चिखली कृषी उत्पन्न बाजार समितीला कित्येक निवेदन रिपब्लिकन सेनेच्या वतीने देण्यात आले पण कोणतीच कारवाई कृषी उत्पन्न बाजार समितीने हमाली नसलेल्या बोगस कामगार यांच्यावर केली नाही बोगस हमाल कामगार यांची पाठ राखण कृषी उत्पन्न WhatsApp Image 2023-05-11 at 4.22.00 PM.jpeg
बाजार समिती करत आहे खरे हमाल यांच्याजवळ पावती असून सुद्धा त्यांना परवाना मिळत नाही त्यांना बाजार समितीमध्ये दहा वेळेस चकरा माराव्या लागत आहे जे बोगस हमाल आहे हे कधी बाजार समितीमध्ये कोणत्याच अडत दुकानांमध्ये काम करताना दिसत नाही अशा बोगस हमालापैकी काही हमाल नोकरी करतात तर काही विविध पदावर आहे त्यांनी बाजार समिती कधी पाहिली नाही कोणत्या प्रकारचे कागदपत्र परवाने काढण्यासाठी लागतात ह्या बोगस कामगारांना माहिती नाही बाजार समितीचे सर्व नियम ढाब्यावर बसून बोगस हमाल कामगार यांचे परवाने तयार केले आहे असे बोगस हमाल कामगार यांचे नाव हमाल मापारी यादीमध्ये आहे कृषी उत्पन्न बाजार समितीने पंधरा दिवसात बोगस हमाली नसलेले कामगार यांच्यावर चौकशी करून कारवाई करू असे लेखी पत्र दिले आणी पंधरा दिवसा पेक्षा दोन महिने झाले पण कृषी उत्पन्न बाजार समिती यांनी बोगस हमाल कामगार यांच्यावर कोणतीच कारवाई केली नाही त्यांची फक्त पाठ राखण करीत राहिले खरे हमाल हे लायसन परवाने यादीपासून वंचित आहे खरे हमालांचे लायसन त्वरित देण्यात यावे यादीत नाव घेण्यात यावे बोगस हमाल नसलेले कामगार यांच्यावर कारवाई येत्या 14/ 5 /2023 रोजी चौकशी करून यादीतून नाव रद्द करण्यात यावे अन्यथा रिपब्लिकन सेनेच्या वतीने लोकशाही मार्गाने कृषी उत्पन्न बाजार समिती समोर 15/ 5/ 2023 रोजी हल्लाबोल आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा रिपब्लिकन सेनेचे बुलढाणा जिल्हा अध्यक्ष भाई विजयकांत गवई यांनी निवेदनामध्ये दिला निवेदन देतेवेळी जिल्हा उपाध्यक्ष ब्रह्माभाऊ साळवे, जिल्हा महासचिव सलीमभाई, जिल्हा कामगार अध्यक्ष रहेमान खान, तालुका उपाध्यक्ष सोहेल सौदागर, संदीप गवई, सिद्धार्थ साळवे, सुनिल ठाखरके,नितीन सुरुशे, जितू भांडवलकर, फेरोज खान, रवी मस्के, इत्यादी कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.
Users Today : 20