बुलढाणा : (खोज मास्टर) अकील शाह
जिल्हाधिकारी कार्यालयातील आवक जावक विभागाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला आहे.आदेश असतांनाही जिल्हाधिकारी कार्यालयातील आवक जावक विभागाचे संबंधित नायब तहसीलदार जबाबदारी स्वीकाराला तयार नाही.
ज्यामूळे आजच्या शेंकडों महत्वपूर्ण निवेदन, मागण्या प्रलंबित असल्याचे धक्कादायक वृत्तसमोर येत आहे. विशेष म्हणजे वरिष्ठ अधिकाऱ्यांचे प्रत्यक्ष निर्देश असतांना सुद्धा प्रत्येक वेळी जिल्हाधिकारी कार्यालया अंतर्गतच संबंधित विभागाकडे निवेदन,तक्रार, मागणी पोहोचण्यास तीन ते चार दिवसांचा कालावधी लागत असल्याची दुर्दैवी बाब सुद्धा या निमित्ताने समोर आली आहे.
जिल्हाधिकारी कार्यालया अंतर्गत आवक जावक विभागात संबंधित नायब तहसीलदार सुट्टीवर असल्यामुळे आवक जावक विभागात आलेले निवेदन, तक्रारी,मागण्या मार्किंग करून पुढे फॉरवर्ड करण्यासाठी सोमवार ते शुक्रवार दरम्यान प्रत्येक नायब तहसीलदार दर्जाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची नियुक्ती तातडीचे निवेदन,मागणी, मार्किंग करून फॉरवर्ड करण्यासाठी नायब तहसीलदार अधिकाऱ्यांची नियुक्तीचे स्वतंत्र आदेशही करण्यात आलेले आहे.
असे असतांनाही आज शुक्रवारला आवक जावक विभागाच्या वतीने संबंधित नायब तहसीलदार यांच्याकडे आजची डाक घेऊन जाणाऱ्या संबंधित मूकबधिर कर्मचाऱ्याला माघारी पाठविण्यात आले आहे. तर सदर कर्मचारी आणि आवक जावक विभागाचे जोशी यांच्याशी चर्चा करून सदर प्रकरणाची सत्यता आस्थापना विभागाचे अधीक्षक यांनी जाणून घेतली आहे.
संबंधित नायब तहसीलदार यांच्याशी प्रत्यक्ष जिल्हाधिकारी महोदयांचे स्वीय सहाय्यक यांनी संपर्क साधला असता त्यांनी जबाबदारी माझी नसल्याचे प्रत्यक्ष सांगितले.
त्यानंतर सदर प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता महत्त्वपूर्ण निवेदने,मांगन्या प्रलंबित असल्यामुळे आझाद हिंद शेतकरी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष अँड सतीशचंद्र रोठे यांनी सदर गंभीर बाब लिखित तक्रारी द्वारे निवासी उपजिल्हाधिकारी दिनेश गीते यांच्या निदर्शनास आणून दिली. त्यावर आस्थापना विभागाच्या अधीक्षक सुळे मॅडम यांच्याकडे त्वरित कारवाई करण्यासाठी सदर तक्रार कार्यान्वित झाली आहे.
तर दोन दिवसात संबंधित नायब तहसीलदार यांची चौकशी करून कारवाई करण्याचे आश्वासन आस्थापना विभागाच्या अधीक्षक यांनी तक्रारदार अँड रोठेंना दिले आहे.
यानिमित्ताने वरिष्ठ अधिकारी असलेले नायब तहसीलदार यांनी जाणीवपूर्वक कर्तव्यात कसूर केल्याची गंभीर बाब समोर येत आहे. संबंधितावर त्वरित कारवाई न झाल्यास सदर प्रकरण जिल्हाधिकारी महोदयांच्या समक्ष ठेवण्याची इशारा आझाद हिंदचे अँड सतीशचंद्र रोठे यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे जाहीर केला आहे.
Users Today : 20