बिटरगांव येथे जात वैधता प्रमाणपत्र सादर न करणे ग्रामपंचायत सदस्यालाभोवले

Khozmaster
1 Min Read

अप्पर जिल्हाधिकाऱ्यांची अपात्रतेची कारवाई.

 

प्रतिनिधी मैनोदिन सौदागर निगंनुर- 

उमरखेड तालुक्यातील बिटरगाव बु ग्रामपंचायत मधील एका सदस्यावर अपात्रतेची कारवाई वेळेच्या आत जात वैधता प्रमाणपत्र सादर करू न शकल्याने झाली.

सविस्तर वृत्त असे कि बिटरगाव बुद्रुक येथील ग्रामपंचायत सदस्य रेणुकाबाई रामा अंकुरवाड यांनी 2021 ची सार्वत्रिक निवडणूक लढवून त्या ग्रामपंचायतीवर सदस्य म्हणून निवडून आल्या. शासन परिपत्रकानुसार त्यांनी 17 जानेवारी 2023 पर्यंत आपले जात वैधता प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक होते. मात्र त्यांना वेळोवेळी सूचना देऊनही व प्रमाणपत्र सादर करण्याची संधी देऊन ही त्या जात वैधता प्रमाणपत्र सादर करू शकल्या नाही तसेच त्यांनी जात वैधता प्रमाणपत्र सादर न करू शकल्याचे कोणतेही ठोस कारण दिले नाही. तसेच त्या कोणत्याही सुनावणीला हजर नव्हत्या. त्यामुळे प्र.की. दुबे साहेब,अप्पर जिल्हाधिकारी यवतमाळ यांनी रेणुकाबाई अंकुरवाड यांचा अपात्रतेचा आदेश जारी केला. यासंदर्भात अँड.अमित बदनोरे यवतमाळ यांचे मार्फत राजेश पिटलेवाड यांनी तक्रार दाखल केली होती.

 

0 9 3 7 6 2
Users Today : 20
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *