देवेंद्र सिरसाट.
(दै, खोजमास्टर) – गडचिरोली वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा बहुजन हृदय सम्राट एड बाळासाहेब आंबेडकर यांच्या कार्य प्रणालीवर विश्वास ठेवून गडचिरोली शहरातील प्रतिष्ठीत नागरीक असलेले कृष्णा रोहनकर व वसंत चापले यांच्या सहित अनेक तरुणांनी एड बाळासाहेब आंबेडकर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून इंदिरा गांधी चौकात झालेल्या सभेवेळी पक्षात प्रवेश केले.
पक्षात प्रवेश करणा-यांमध्ये प्रशिक नागरे, अनमोल बोलिवार, बादल मोहुर्ले, प्रतिक दुर्गम, पवन गणविर, प्रांजल रामटेके, चेतनशर्मा जनगम, दिपरत्न रामटेके आदिंचा समावेश आहे.
पक्षात प्रवेश करणा-या सर्व कार्यकर्त्यांचा जिल्हाध्यक्ष बाळू टेंभुर्णे यांनी पक्षाचा दुपट्टा खांद्यावर घालून व पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी जिल्हा महासचिव योगेंद्र बांगरे, जिल्हा उपाध्यक्ष जी के बारसिंगे, संगठक धर्मेंद्र गोवर्धन, तालुकाध्यक्ष बाशिद शेख, शहराध्यक्ष दिलीप बांबोळे, तालुका उपाध्यक्ष आशिष केळझरकर, सोशल मिडीया प्रमुख जावेद शेख, शहर महासचिव सोनलदिप देवतळे, शहर संगठक भारत रायपूरे आदि उपस्थित होते.
वंचित बहुजन आघाडीमध्ये प्रवेश करणा-यां कार्यकर्त्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून येणा-या काळात प्रस्थापीत पक्षांच्या बरोबरीचे स्थान जिल्ह्यात निर्माण होईल असे मत बाळू टेंभुर्णे यांनी यावेळी व्यक्त केले.
Users Today : 20