मुर्तिजापूर.
शहरातील तिडके नगर येथील महाराष्ट्र नवनिर्माण सेना तालुका जनसंपर्क कार्यालया समोर धर्मवीर छ.संभाजी महाराज जयंती मोठ्या उत्सवात साजरी करण्यात आली.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे तालुकाध्यक्ष गौरव मोरे यांच्या हस्ते धर्मवीर छ.संभाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून समाजसेवत पप्पु भाऊ तिडके, विठ्ठलराव गौरखरडे,सुनिलभाऊ पुंड उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी रोहन नवघरे,चेतन सोळंके,अनिकेत शिरभाते, स्वप्नील लाटेकर,वैभव महल्ले,आदित्य खोकले,सचिन काटोले,देशपांडे साहेब ,विनोद मानकर,नंदकिशोर मालवे, विनोद वानखडे,खंडारे साहेब ,संतोष रुद्रकार यांनी परिश्रम घेतले.
यावेळेस असंख्य शंभुप्रेमी उपस्थित होते.
Users Today : 20