अनुराधा इंग्लिश मिडीयम स्कूल सीबीएससी चा 100/% निकाल

Khozmaster
1 Min Read

” दिनांक 15/05/2023 स्थानिक चिखली तालुक्यातील अनुराधा इंग्लिश मिडीयम स्कूल सी. बी. एस. सी. इयत्ता 10 वी च्या विद्यार्थ्यांनी नेत्रदीपक यश प्राप्त केले आहे आणि दरवर्षी प्रमाणे यंदाही उत्तुंग यशाची परंपरा कायम राखली आहे. 5 विद्यार्थी हे 90% च्या वर प्राविण्य श्रेणीत तर 26 विद्यार्थी हे प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत. अमर काळे हा स्कूल मधुन 93% गुण प्राप्त करून प्रथम आला आहे. कु. अदिती थोरवे हिने 92%‌ , संकेत राऊत आणि ओम पाटील ह्यांनी 91% तर सृष्टी महाजन हिने 90% गुण संपादन केले आहेत. या यशाबद्दल सर्व विद्यार्थी, त्यांचे पालक आणि शिक्षक यांचे सर्वांनी हार्दिक अभिनंदन केले आहे. याप्रसंगी स्कूलच्या अध्यक्षा ॲडवोकेट सौ. वृषाली ताई बोंद्रे, प्राचार्या‌ सौ. जया नन्हई , सल्लागार सुजाता कुल्ली यांनी संपूर्ण टीम चे अभिनंदन करुन यशस्वी विद्यार्थ्यांना उज्ज्वल भवितव्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत”.

 

0 9 3 7 6 2
Users Today : 20
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *