इस्माईल शेख शेगाव शहर प्रतिनिधी
संपूर्ण विदर्भाचे लक्ष लागून असलेल्या विदर्भामध्ये नावाजलेली व सर्वात मोठी आणि सर्वात जुनी नांदुरा अर्बन बँकेच्या निवडणुकी साठी उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे. नांदुरा तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष तसेच शिवसेनेचे माजी तालुका उपप्रमुख असलेले सामाजिक राजकीय क्षेत्रात सेवाभावी कार्यामध्ये सतत आघाडीवर राहणारे सर्वसामान्यांना न्याय मिळवून देण्यासाठी अन्याय अत्याचार विरुद्ध आवाज बुलंद करणारे नांदुरा अर्बन बँकेच्या सर्वसाधारण मतदार संघातून सुरेश दादा पेठकर यांनी आज 15 मे रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले व ढोल ताशाच्या गजरात शेकडो समर्थकासह भव्य अशी मिरवणूक काढून आपला उमेदवारी अर्ज भागधारक सभासद मतदारसंघातून निवडणूक निर्णय अधिकारी सांगळे साहेब यांच्याकडे दाखल केला यावेळी प्रभाकर बघे पवन अशोक टावरी ,जीवन भन्साली जळगाव यांनी सुद्धा आपापली उमेदवारी अर्ज दाखल केले. यावेळी शैलेश भाऊ वाकोडे गजानन भाऊ बोडकुडे शेख रफिक भाई यांच्यासह सुरेश दादा पेठकर यांचे समर्थक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते नांदुरा अर्बन बँकेच्या होत असलेल्या निवडणुकीमध्ये भागधारक सभासद मतदारसंघातून आपणच विजय होऊ असा विश्वास सुरेश दादा पेठकर यांनी यावेळी कार्यकर्त्यांसमोर मार्गदर्शन करताना व्यक्त केला नांदुरा अर्बन बँकेच्या निवडणुकीमध्ये तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष असलेले सुरेश दादा पेठकर यांनी उडी घेतल्यामुळे व अर्ज दाखल केल्यामुळे या निवडणुकीमध्ये रंगत वाढली आहे एवढे मात्र निश्चित
Users Today : 20