सरपंचांचा उच्चशिक्षित मुलगा आणि उपसरपंच हाकतात मनमानीपणे गावाचा कारभार

Khozmaster
1 Min Read

इतर सदस्यांना विश्वासात न घेता “माया” जमावण्यात व्यस्त.

प्रतिनिधी मैनोदिन सौदागर निगंनुर –

 

खरूस खुर्द ग्राम पंचायतीचा कारभार सध्या मनमानी सुरु असून गावातील सरपंचांचा मुलगा व उपसरपंच दोघे मिळून गावाचा कारभार मनमानीपणे चालवत आहेत.

खरूस खुर्द येथे महिला सरपंच असून त्या निरक्षर आहेत. शासन परिपत्रकानुसार महिला ग्रामपंचायत पदाधिकारी असेल तर तिच्या कुटुंबातील सदस्यांनी ग्रामपंचायत कारभारात लुडबुड करायला नाही पाहिजे मात्र खरूस खुर्द येथे शासनाच्या या निर्णयाला खो देत सरपंचांचा “उच्चशिक्षित” मुलगा उपसरपंचला हाता खाली घेऊन जणू स्वतःच सरपंच असल्याच्या तोऱ्यात ग्रामपंचायत कार्यालयात येऊन कारभार पाहत आहे तसेच माया कशी जमते या प्रयत्नात तो असून जनतेच्या पैसा गटकण्याचा त्यांचा प्रयत्न असल्याचे बोलले जात आहे. ग्रामपंचायत च्या कारभारात सरपंच बाई ला न आणता त्यांचे अंगठे सुद्धा तो उच्च शिक्षषित मुलगा मारत असल्याचे बोलले जात आहे. विशेष म्हणजे आपल्या सहकारी सदस्यांना याची कानोकान खबर लागू न देण्याचे अनोखे कौशल्य दोघांनी मिळून आत्मसात केले असून सरपंचांचा मुलगा आणि उपसरपंच “येडे बनून पेढे खात “असल्याची चर्चा सध्या खरूस खुर्द येथे जोरात सुरु आहे.

नागरिकांच्या म्हणण्यानुसार गावात विविध योजने मध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होत आहे.

या सर्व प्रकाराची लवकरच पोलखोल होणार असून अश्या या गावखाणाऱ्याना वेळीच जागा दाखवण्याची वेळ आली असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

 

0 9 3 7 6 2
Users Today : 20
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *