तोमाई इंग्लिश स्कूल दहावी सीबीएसई चा 100% टक्के निकाल

Khozmaster
1 Min Read

बुलढाणा दि. 15

येथील तोमाई इंग्लिश स्कूलच्या इयत्ता दहावी सीबीएसई चा निकाल 100 टक्के लागला असून तोमाई स्कूलमधील दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांच्या गुणगौरव समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. प्रतिमा व्यवहारे होत्या. तर प्रमुख उपस्थिती म्हणून सोनाली दळवी डॉ. जी. वाय. व्यवहारे एडवोकेट सुधाकर दळवी, ललित चोपडा, यांचे सह प्राचार्य अजित जवंजाळ यांची उपस्थिती होती. दहावीतील गुणवंत विद्यार्थ्यांना भेट कार्ड व गुलाब पुष्प देऊन त्यांचे अभिनंदन करण्यात आले. उत्तीर्ण विद्यार्थ्यांना पुढील उज्वल भविष्यासाठी सर्व मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमासाठी पालकांची मोठी उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महेंद्र झनके यांनी तर आभार प्रदर्शन पूजा वावरे यांनी केले.

 

0 9 3 7 6 2
Users Today : 20
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *