विवाहोत्तर कालखंडात वरपक्षाचा स्वाभिमान धारण करावा. भागवताचार्या सौ. ज्ञानेश्वरीताई भालतिलक

Khozmaster
1 Min Read

प्रतिनिधी विशाल गवई अकोट 

माहेरी गरिबीत जीवन जगणारी मुलगी विवाहित होऊन कितीही श्रीमंतांच्या घरात नांदायला गेली तरी तिचे माहेरा वरील प्रेम कधीच कमी होत नाही. हे जरी सत्य असले तरी ; विवाहोत्तर कालखंडात मधे जीवन जगणाऱ्या प्रत्येक मुलींनी आपले आपले वैवाहिक जीवन सुखी व सन्मानपूर्वक जगता यावे असे वाटत असेल तर,पित्रृपक्षाचा नाही तर वरपक्षाचा स्वाभिमान धारण करावा असे कळकळीचे आवाहन सौ. ज्ञानेश्वरीताई भालतिलक यांनी केले.

त्या आज श्री ज्ञानभास्कर सेवा संस्थान हिंगणी खुर्द द्वारा श्री संत वासुदेवजी महाराज स्मृती मंदिर ज्ञानेश आश्रम वारी भैरवगड येथे आयोजित श्री माऊली सर्वांगीण विकास बालसंस्कार शिबिरात बहूसंख्येने सहभागी असलेल्या मुलींशी संवाद साधतांना बोलत होत्या.

त्या पुढे म्हणाल्या की ! भारतीय पौराणिक इतिहासा पासून तर आजतागायत जेव्हा जेव्हा विवाहित मुलींनी सासर पेक्षा माहेरचा स्वाभिमान धारण केला तो तिच्या श्रीमद्भागवतातील भगवान शिवजीची प्रथम पत्नी सतीदेवी प्रमाणे सर्वनाशाला कारणीभूत ठरला आहे असे सोदाहरण पटवून दिले.

 

0 9 3 7 6 2
Users Today : 20
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *