जिल्हा परिषद शाळा मुंडगावच्या शिरपेचात मानाचा तुरा

Khozmaster
1 Min Read

अकोट प्रतिनिधी विशाल गवई 

मुंडगाव येथील रितेश प्रमोद पुरांत या विद्यार्थ्याने मिनी आएएस म्हणून प्रसिद्ध असलेली एस.एस.सी.सी.जी.एल.

परीक्षेमध्ये घवघवीत यश मिळवले आहे आणि इन्स्पेक्टर एक्झामिनर या पोस्टवर त्याची निवड झालेली आहे.

ही परीक्षा पास करणारा मुंडगाव येथील हा पहिलाच विद्यार्थी आहे.

विशेष म्हणजे रितेशचे प्राथमिक शिक्षण हे जिल्हा परिषद प्राथमिक मुलांची शाळा मुंडगाव येथे मराठी माध्यमातून झाले आहे.

सन २००८ला अमर भागवत सर मुंडगाव येथे रुजू झाले.ते त्याचे वर्गशिक्षक होते.तर रामकृष्ण कडू हे मुख्याध्यापक होते. जिल्हा परिषद शाळेतच प्राथमिक शिक्षण घेऊन पाचवी त्याने गणगणे विद्यालयातून उत्तीर्ण करून नंतर नवोदय मध्ये प्रवेश मिळवीला.

मुळातच कुशाग्र बुद्धीमत्ता असलेल्या रितेशची घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची होती वडील मोलमजुरी करायचे तरीसुद्धा आपल्या बुद्धिमत्तेच्या जोरावर नवोदयला प्रवेश मिळवीत आपले पुढील शिक्षण त्याने नवोदय मधून पूर्ण करून आयएएस सारखी काठीण्य पातळी असलेली एसएससी सीजीएल ही परीक्षा उत्तीर्ण करून शाळेच्या आणि गावाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.

 

0 9 3 7 6 2
Users Today : 20
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *