स्व. राधिका साठी चिखलीत कडकडीत बंद राधिका च्या मारेकऱ्यांना फाशी देण्याची मागणी!

Khozmaster
2 Min Read

चिखली. (मन्सूर शहा दै. खोज मास्टर न्यूज.) सविस्तर माहिती अशी की १२ मे दुपारी तपोवन रोहडा पोलीस स्टेशन अंढेरा येथून राधिका मिसिंग होती अशा प्रकारचे तक्रार अंढेरा पोलीस स्टेशनला राधिकाच्या कुटुंबाच्या वतीने देण्यात आली होती. यावर पोलीस स्टेशन अंढेरा ठाणेदार यांनी शोध पत्रिका काढून सर्व पोलीस स्टेशनला राधिकाचे शोध घेण्यात कळवले होते. पोलीस प्रशासन प्रत्येक ठिकाणी राधिकाचे शोध घेत असताना १३ मे २०२३ रोजी दुपारी अडीच तीनच्या दरम्यान राधिकेचा मृतदेह तपोवन देवी मंदिराच्या लगत 500 ते 600 मीटरचे अंतरावर राधिकेचा मृतदेह सापडला होता. प्रथमदर्शी पाहण्यात असे समजण्यात आले की कोणीतर. राधिकेचा दगडाने ठेचून खून केला असावा. परंतु ही घटना म्हणजे सर्व समाजाला सुन्न करणारी घटना झाली होती.. स्वर्गीय राधिकेला न्याय मिळावा व तिच्या मारेकरांना फाशीची शिक्षा व्हावी याकरिता चिखलीकरांनी स्वयंपुरतीने बंद पुकारण्यात आला असून या बदला सर्व व्यापाऱ्यांनी स्वयंपूर्ण प्रतिसाद दिला असून आज आठवडी बाजाराचा दिवस असून सुद्धा व्यापाऱ्याने आपले नुकसान सहन करून राधिकेच्या समर्थनात मोर्चा काढून त्याबद्दल सहानभूतीची भावना दाखवली आहे. या मोर्चामध्ये सर्व राजकीय व सामाजिक क्षेत्रातील , व्यक्ती सहभागी झाली होती. राधिकेच्या मारेकर्‍यांना फाशीची शिक्षा देण्यात यावी व सदर प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टा मध्ये चालवण्यात यावे अशा घोषणा देत मोर्चे करे यांनी आपली भावना व्यक्त केली. आता सामान्य लोकांच्या अपेक्षा पोलीस प्रशासनाकडून लागली असून लवकरात लवकर राधिकेच्या मारेकऱ्यांना अटक करून कोर्टात हजर करावे , व त्यांना फाशीची शिक्षा व्हावी अशी अपेक्षा जनसामान्यातून होत आहे.

 

0 9 3 7 6 2
Users Today : 20
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *