सोयगाव येथील अनुदानाची रक्कम कर्ज खात्यात जमा करु नका;मा.सभापती धरमसिंग चव्हाण

Khozmaster
2 Min Read

सोयगाव प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत

सोयगाव तालुक्यात व सावळदबारा परिसरात यंदा वर्षीचा दुष्काळ आणि यावर्षी परतीच्या पावसामुळे झालेले नुकसान लक्षात घेऊन माजी सभापती धरमसिंग चव्हाण यांनी कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांच्या कडे समकक्ष भेटून शेतकऱ्यांना बदल लेखी निवेदन दिले.कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी तातडीने दखल घेऊन शेतकऱ्यांचे नुकसान लक्षात घेऊन सोयगाव तालुक्यातील सर्व बँक शाखाधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांवर कर्ज वसुलीसाठी सक्ती करू नये, तसेच त्यांना शासनाकडून मिळणारे अनुदान कर्ज खात्यात जमा न करता त्वरित वितरण करावे, बँकेत आलेल्या शेतकऱ्यांना त्यांच्या मातृभाषेत सन्मानाने उत्तरे द्यावीत,’ अशा सूचना सोयगाव,सिल्लोड तहसीलदार रमेश जसवंत यांनी बँक शाखाधिकाऱ्यांना दिल्या. आमदार अब्दुल सत्तार यांनी दोन दिवसांपूर्वी उपविभागीय अधिकारी कार्यालयात नुकसान भरपाई व पीक पंचनामा आढावा बैठक घेतली होती. यावेळी, बँकेत गेलेल्या शेतकऱ्यांसोबत हिंदीत बोलले जाते व असन्मानपूर्वक वागणूक दिली जाते. बँकांनी शेतकऱ्यांकडे कर्ज वसुलीसाठी तगादा लावला आहे. शासनाकडून मिळणारे नुकसान भरपाई अनुदान बँक शाखाधिकारी कर्ज खात्यात कपात करून घेतात, आदी सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या होत्या. त्या अनुषंगाने तहसीलदार रमेश जसवंत यांनी तहसील कार्यालयात सोयगाव,सूचना -बँक शाखाधिकारी व कर्मचाऱ्यांनी शेतकरी व ग्राहकांना मराठीत माहिती द्यावी. -शेतकऱ्यांचे मनोबल खचेल अशी कोणतीही कृती बँकेकडून होता कामा नये. -शेतकरी व ग्राहकांना सन्मानाची वागणूक द्या. -संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना कर्ज वसुलीची सक्ती करू नका. -शासनाकडून मिळणारे अनुदान सरळ शेतकऱ्यांना द्यावे.अशे निवेदन माजी सभापती धरमसिंग चव्हाण यांनी कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांच्या कडे दिले आहे.

0 9 3 7 6 2
Users Today : 20
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *