सोयगाव प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत
सोयगाव तालुक्यातील सावळदबारा येथे दि.१४/५/२३ रोजी ग्रामपंचायत कार्यालयात व गावात विविध ठिकाणी छत्रपती संभाजी महाराज यांची ३६६ वी जयंती साजरी करण्यात आली.छत्रपती संभाजी राजे एकदाही पराभव न स्विकारणारे…. एकदाही माघार न घेणारे….. एकदाही तह न करणारे…. १२० लढाया लढणारे व सर्वच्या सर्व जिंकणारे जगातील पहिले बाल साहित्यीक ज्यांनी बुधभूषण, नखशिख, नायिकाभेद, सातसतक इत्यादी ग्रंथांचे लेखन करणारे, जंजीरा जिंकण्यासाठी समुद्र बुजविणारे, जगातील पहिले बुलेटप्रुफ जॅकेट तयार करणारे….डोंगर पोखरून शेतीला पाणी पुरवणारे, आठ भाषांवर प्रभुत्व असणारे वीर पराक्रमी योध्दा, बुध्दीमान, साहित्यिक, शाक्तपंथीय, वडीलधाऱ्यांचा मान ठेवणारे…
छत्रपती संभाजी महाराजांना मानाचा मुजरा..! करुन त्यांच्या प्रतिमेला सरपंच सौ.शिवगंगा शिवाआप्प चोपडे, उपसरपंच,मो.आरिफ मो.लुकमान व ग्रा.सदस्य मोहन सुरडकर, शांताराम खराटे, संदीप कोलते,पिऊष कोते, समाधान कोते,पो.पा.विलास कुल्ले यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले तद्नंतर उपस्थित मान्यवरांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले व सायंकाळी पाच वाजता ढोल ताशाच्या गजरात छत्रपती संभाजी महाराज यांची प्रतिमा टक्टर मधे ठेवून जल्लोषात मिरवणूक काढण्यात आली.चौका चौकात छत्रपती संभाजी राजे यांच्या प्रतिमेचे महिलांनी पूजन केले.छत्रपती संभाजी राजे यांच्या जयघोषाने सावळदबारा नगरी दुमदुमून गेली होती.यावेळी फर्दापूर पोलिस ठाण्याचे सपोनि भरत मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली सावळदबारा बिट जमादार मिरखाॉ तडवी, शिवदास गोपाळ व पोलीस कर्मचारी यांनी चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
Users Today : 20