बुलढाणा : मेहकर – तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्य संघटनेचे संस्थापक अध्यक्ष मा.संदिप भाऊ गवई यांनी आपल्या या छोट्या खानी भाषणात सांगितले की महाराष्ट्र स्वाभिमान रिपब्लिकन पक्षाचे संस्थापक तथा माजी नगरसेवक कालकथीत मनोजभाई संसारे यांचे शुक्रवारी दीर्घ आजाराने निधन झाले ते आंबेडकरी चळवळीतील सक्रिय कार्यकर्ते होते मनोजभाई संसारे हे गेल्या वर्षभरापासून आजारी होते त्यांच्या निधनानंतर राजकीय क्षेत्रात हळहळ व्यक्त करण्यात आली तथागत ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष मा.संदिप भाऊ गवई यांनी मनोजभाऊ संसारे यांना श्रध्दांजली वाहिली. व तथागत ग्रुपचे कल्याण तालुका अध्यक्ष आयु.नंदलाल पगारे यांचे ते आत्याभाऊ यांना नेहमी आंबेडकरी चळवळीत काम करण्यासाठी व तथागत ग्रुपला मुंबईतील कुठल्याही क्षेत्रातील काम करण्यासाठी सहकार्य करायचे आशा या आंबेडकरी चळवळीतील विचारवंत आणी झुंजार लढवय्या म्हणून कालकथीत मनोज संसारे यांची ख्याती होती ते युथ रिपब्लिकन पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष होते संसारे यांच्या निधनाने आंबेडकरी चळवळीवर शोककळा पसरली आहे त्यांच्या पश्चात एक मुलगा एक मुलगी आणी पत्नी असा परीवार आहे असे यावेळी तथागत ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष मा.संदिप भाऊ गवई यांनी आपल्या छोट्याखानी भाषणात सांगितले व समस्त तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्य संघटनेतील पदाधिकारी सदस्य महिला आघाडी व गवई परीवार कडुन त्यांना यावेळी अभिवादन करण्यात आले..
यावेळी तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्य संघटनेचे संस्थापक अध्यक्ष मा.संदिप भाऊ गवई,महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष मा.अख्तर कुरेशी,महाराष्ट्र राज्य संघटक मा.कुणाल माने,महाराष्ट्र राज्य प्रसिद्धी प्रमुख मा.राधेश्याम भाऊ खरात,महाराष्ट्र राज्य सचिव अनिल देबाजे, बुलढाणा जिल्हा अध्यक्ष (सरपंच) मा.दिलीप हेलगे साहेब,मेहकर तालुका अध्यक्ष मा.सचिन गवई, मेहकर शहर अध्यक्ष मा.विशालभाऊ बाजड,योगेश अवसरमोल,शंकर चव्हाण,सुनिल खंडारे,आदी तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्य संघटनेचे समस्त पदाधिकारी कार्यकर्ते महिला आघाडी उपस्थित होते..
Users Today : 20