विद्यार्थी सुशिक्षित व संस्कारित होऊन समाजात गेला तरच समाजाची उन्नती होऊ शकते. -डॉ. प्रशांत कोठे

Khozmaster
2 Min Read

बुलढाणा दि 13

विदर्भातील शैक्षणिक क्षेत्रात नावलौकिक असलेलं जिजामाता महाविद्यालय हे विद्यार्थी हित लक्षात घेऊन शैक्षणिक प्रगती पथावर असलेले एक महाविद्यालय आहे. महाविद्यालयाच्या प्रगतीत, विकासात सर्वच घटकांचे महत्त्वाचे योगदान आहे. विद्यार्थी सुशिक्षित व संस्कारित होऊन समाजात गेला तरच समाजाची उन्नती होऊ शकते. या महाविद्यालयातील माजी विद्यार्थी सगळ्याच क्षेत्रात दर्जेदार व समाजाभिमुख कामे करतात याचा महाविद्यालयाला सार्थ अभिमान असल्याचे मत महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रशांत कोठे यांनी माजी विद्यार्थ्यांच्या मेळाव्यात अध्यक्षस्थानावरुन बोलतांना व्यक्त केले. याप्रसंगी प्रा. सुबोध चिंचोले म्हणाले की माजी विद्यार्थी व प्राध्यापक यांच्यात संवादचा सेतू असावा आणि या संवादातून काही चांगले विचार समोर येऊन महाविद्यालयाचे प्रगती साधता येईल. प्राध्यापक व माजी विद्यार्थी यांच्यात मित्रत्वाचे नाते असले पाहिजे. संवादाच्या माध्यमातून महाविद्यालयात येणाऱ्या अडचणीवर तोडगा निघून विद्यार्थ्यांचे भविष्य उज्वल घडविण्यासाठी माजी विद्यार्थ्यांचे योगदान महत्वपूर्ण आहे. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात डॉ. एम. डी. जाधव यांनी या महाविद्यालयातील विद्यार्थी समाजात चांगले विचार रुजवण्याचे काम सातत्याने करतात. ही महाविद्यालयाच्या दृष्टीने गौरवास्पद बाब असल्याचे सांगितले. याप्रसंगी मंचावर डॉ. येरणकर यांचेसह माजी विद्यार्थी प्रतिनिधी श्री तुषार काचकुरे, श्री संदीप अग्रवाल, सौ. विद्या साळवे यांची उपस्थिती होती. महाविद्यालयाची माजी विद्यार्थी संघटना ऋणानुबंध मल्टीपर्पज सोसाटीचे अध्यक्ष डॉ. एस. एम. कानडजे, प्रा. सुनील सपकाळ, श्री रवींद्र लहाने यांनी उपस्थिती दर्शविली. याप्रसंगी माजी विद्यार्थ्यांनी आपल्या मनोगतातून महाविद्यालयाप्रती आपली कृतज्ञता व्यक्त करत आपण जिजामाता महाविद्यालयाच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव सहकार्य करू असे आश्वासन दिले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ विकास पहूरकर यांनी तर आभार प्रदर्शन प्रा. पवन ठाकरे यांनी केले. या कार्यक्रमासाठी माजी विद्यार्थ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

0 9 3 7 6 2
Users Today : 0
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *