जुने शहर व डाबकी रोड परीसरात सायंकाळी 6 ते 8 वाजे प्रर्यत जमावबंदीचे आदेश तर रात्री 8 ते सकाळी 8 प्रर्यत संचारबंदी (कर्फ्यू ) तसेच सिटी कोतवाली व रामदास पेठ परीसरात पुर्ण वेळ जमावबंदी
अकोला :प्रतिनिधी अशोक भाकरे अकोला
खोज मास्टर न्यूज, ज्याअर्थी, दि १३/०५/२०२३ रोजीच्या रात्रीच्या २२.३० वा. अचानक दोन गटाच्या जमावाने पोलीस स्टेशन रामदासपेठ येथे जमुन दगडफेकीस सुरवात केली. मोबाईलवर आक्षेपार्ह संदेश फिरल्यामुळे सदर जमावाने दगडफेक करून शांतता भंग केली आणि सार्वजनिक मालमत्तेची जाळ पोळ करून नुकसान केले त्यामुळे जनतेत भितीचे वातावरण निर्माण झाले होते. त्यास प्रतिबंध करणेसाठी अकोला शहरातील कोतवाली, रामदासपेठ,जुने शहर, डाबकी रोड या पोलीस स्टेशन चे हद्दीमध्ये मा. जिल्हादंडाधिकारी निमा अरोरा यांनी दि. १४/०५/२०२३ रोजी फौजदारी प्रक्रीया संहिता १९७३ चे कलम १४४ चे आदेश लागु करून परिसरात संचारबंदी लागू करण्याचे।आदेश दिले होते तरी सदरचे आदेशा मध्ये बदल करून दि. १५/०५/२०२३ रोजी पासुन जुने शहर व डाबकी रोड परिसरात सायंकाळी ०६/०० वा. ते ०८/०० वा. पर्यंत अशी ०२ तासांचे जमावबंदीचे ओदश तसेव रात्री ०८/०० वा. सकाळी ०८/०० वा. पर्यंत संचारबदीचे आदेश आदेशीत करण्यात आले आहेत तसेच सिटी कोतवाली व रामदास पेठ परिसरात दि. १५/०५/२०२३ पासुन पुर्ण वेळ जमावबंदी चे आदेश करण्यात आले असुन । सर्व जनतेस शांतता राखण्याचे आव्हाण करण्यात आले आहे. तसेच सदर घटनेच्या अनुषंगाने मा. विषेश पोलीस महानिरीक्षक तसेच पोलीस अधीक्षक व अपर पोलीस अधीक्षक, अकोला यांनी आज दिनांक १५/०५/२०२३ रोजी मुस्लीम उलमांचे सदस्यांची बैठक घेउन त्यांना मुस्लीम समुदायामध्ये शांतता राखण्याचे आव्हान केले असुन कुठल्याही समाज कंठकाणवर विश्वास ठेवु नये असे त्यांना आव्हान केले असुन असे कृत्य जो कोणीकरत असेल तर त्याचेविरूध्द कायदेशिर कारवाई करण्यात येईल. सदर घटनेनंतर घटनेबाबत विविध पोलीस स्टेशनला अरोपींन विरूध्द दंगा करणे, गैरकायद्याची मंडळी जमा करणे, खुन करणे, खुनाचा प्रयत्न करणे, सरकारी कर्मच्यावर हल्ला करणे, सार्वजनिक मालमत्तेची नुकसान करणे अशा प्रकारे खालील नमुद कलमान्चे गुन्हे दाखल करण्यात आले असुन पोलीस स्टेशन जुने शहर येथे ०४ गुन्हे तसेच रामदास पेठ ०२ गुन्हे दाखल करून।सदर गुन्हयामधील आतापर्यंत १०१ आरोपींना अटक करण्यात आलेली असुन बाकी आरोपींचा शोध घेवुन त्यांना अटक करून योग्य ती कायदेशिर कारवाई करण्यात येईल. तसेच कुठलाही अनुचित प्रकार घडुनये कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्मान होवु नये तसेच सार्वजनिक सुव्यस्था बाधीत राहण्यासाठी पोलीस प्रशासनाने अपर पोलीस अधीक्षक-१ (बुलढाणा), उपविभागीय पोलीस अधिकारी-१(खामगांव), उपविभागीय पोलीस अधिकारी-१(अमरावती), RCP-3 प्लॉटुन (अकोला), RCP-1 प्लॉटुन (वर्धा), RCP-1 प्लॉटुन (अमरावती), RCP-1 प्लॉटुन (बुलढाणा), SRPF G-9 Amravti चे ०२ कंपनी तसेच SRPF G-12 Hingoli चे ०२, कंपनी असे पोलीस अधिकारी / कर्मचारी यांना बंदोबस्ता करीता बोलावण्यात आले असुन त्यांना सुद्धा बंदोबस्तात तैनात करण्यात आले आहे. जुने शहर परिसरात तसेच अकोला शहरात शांतता आहे.
Users Today : 0