चिखली मन्सूर शहा दै. खोज मास्टर न्यूज.
सहा वर्षाय, चिमुकलीच्या खुना च्या तपासासाठी एस डीपीओ यामावर यांच्या नेतृत्वात, तिन पथकाची नेमणूक करण्यात आली असून, एका अज्ञात व्यक्तीने सहा वर्षाच्या चिमुकलीचा गळा आवलुन खून केला होता. व तिची विल्हेवाट लावण्यासाठी मंदिराच्या मागे नेऊन तिच्यावर दगड रचून तिचा मृत्यूदेह दाबुन तो फरार झाला आहे. ही घटना १४ मे रोजी दुपारी रोहडा येथील तपोवन देवी संस्थान मध्ये उघडकीत आली होती . खुणाचा तपास एचडीपीओ यामावार यांनी हाती घेऊन तीन पथके तयार करण्यात आली असून अंधेरा पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या रोहडा येथे गावच्या पूर्वेस,१ किलोमीटर अंतरावर जिल्ह्यात प्रसिद्ध असलेल्या एक मोठे तपोवन देवी संस्थान आहे या संस्थांमध्ये दररोज विविध कार्यक्रम साजरे केले जात असून .लोकांची मोठी वर्दळ असते १२ मे रोजी चिखली तालुक्यातील तांबुळवाडी व देऊळगाव राजा तालुक्यातील महार खेड येथील लग्न समारंभाचा कार्यक्रम तपोवन देवी सत्तांमध्ये ठेवण्यात आला होता या लग्नामध्ये तांमसी ता. बालापुर जि. अकोला येथील कु. राधिका विलास इंगळे वय वर्ष ६ ही आई-वडिलांसोबत लग्नाला आली होती लग्न सोहळा असल्याने सर्व पाहुणे मंडळी आपापल्या कामात व्यस्त होते. मात्र बराच वेळ होऊन राधिका न दिसल्यामुळे शोधा शोध, सुरू झाली आणि पोलिसांनाही कळवण्यात आले. माहिती मिळतात ठाणेदार गणेश हिवरकर यांनी घटनास्थळी दाखल होऊन मंदिरात सर्व परिसर पिंजून काढत असताना पीआय वाघ ,यांना मंदिराच्या मागे नवीन दगड एकावर एक टाकलेले दिसले हे पाहून लगेच दगड काढले असता कुमारी राधिका दबलेल्या मुर्त अवस्थेत, दिसली . तिला बाहेर काढले .आणि पंचनामा केला. असता तिचा गला, दाबून खून केल्याच्या आढळून आलेचे, समजते. या. प्रकरणी ठाणेदार यांनी अज्ञात आरोपी विरुद्ध कलम 302 363 प्रमाणे गुन्हा दाखल करून हे प्रकरण एस डी पी ओ यामावार यांनी हाती घेतला असून कु. राधिकाच्या हत्यारे शोधण्यासाठी तीन पथके, तयार करून तपास सुरू केला आहे .यामुळे निष्पाप राधिकाच्या हत्यारा कोण हे तपास केल्यानंतर सांगण्यात येईल , असे एस डी पी ओ, यामावार यांनी सांगितले आहे.
Users Today : 0