चिखली प्रतिनिधी
तालुक्यातील रोहडा येथील तपोवन देवी मंदिराच्या परिसरात पडलेल्या सहा वर्षीय राधिका विलास इंगळे या चिमुकलीच्या हत्या प्रकरणाचा अखेर पोलिसांनी छडा लावला आहे. राधिकाच्या मारेकऱ्याला पोलिसांनी जेरबंद केले आहे. मंदिराच्या परिसरात पूजा साहित्याची विक्री करणाऱ्या सदानंद भगवान रोडगे (वय २६, रा. रोहडा, ता. चिखली) यानेच राधिकावर अत्याचार करून तिची हत्या केल्याचे उघडकीस आले आहे.
याबाबत माहिती अशी की, शुक्रवारी, १२ मे रोजी अकोला जिल्ह्याच्या बाळापूर तालुक्यातील तामसी येथील विलास इंगळे कुटुंबासह रोहडा तपोवन देवी संस्थान | नातेवाईकांच्या लग्नासाठी आले होते. वा दरम्यान सकाळी ११ वाजतापासून त्यांची सहा वर्षीय मुलगी राधिका बेपत्ता झाली होती. नातेवाईकांनी शोध घेतला मात्र, ती सापडली नाही. त्यामुळे तिच्या आईने अंबेरा पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली.
» मंदिर परिसरातील पूजा साहित्य विक्रेत्याने केली हत्या
त्यानंतर पोलिसांनी राधिकाचा शोध सुरू केला होता. मात्र रात्री उशिरापर्यंत राधिका साप शकली नाही. शनिवारी, १३ मे रोजी आरोपी सदानंद रोडगे पोलिसांनी तपोवन देवी मंदिराच्या परिसरात पुन्हा शोधमोहीम राबविली. या दरम्यान दुपारी मंदिराच्या मागील बाजूस सुमारे पाचशे मीटर अंतरावर असलेल्या नाल्यात राधिकाचा मृतदेह संशयास्पद स्थितीत आढळून आला होता. गुन्ह्याचा प्रकार अत्यंत संवेदनशील असल्याचे निदर्शनास आल्याने प्रारंभी दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यांमध्ये भादंविच्या कलम ३०२.
6 वर्ष्याच्या निष्पाप बालिकेवर अत्याचार करून आवळला गळा
राधिकाचा शवविच्छेदन अहवाल पोलिसांना प्राप्त झाला आहे. स्वामध्ये आरोपीने तिच्यावर लैंगिक अत्याचार करून राधिका इंगळे रुमालाच्या साह्याने आवळून हत्या केली असल्याचे नमूद आहे.
३६४, २०१ प्रमाणे वाढ करण्यात आली. जिल्हा पोलिस अधीक्षक सुनील कहासने व अपर पोलीस अधीक्षक बी. बी. महामुनी यांनी तपासाबाबत आवश्यक सूचना दिल्या. त्यानंतर उपविभागीय पोलीस अधिकारी विलास यामावार यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अशोक लांडे,
अंबेराचे ठाणेदार हिवरकर यांच्या नेतृत्वात पोलिसांची तपास पथके नियुक्त करण्यात येऊन तपास सुरू करण्यात आला.
पोलिसांनी या प्रकरणात विविध शक्यता लक्षात घेऊन तपास सुरू केला. राधिकाची हत्या ओळखीच्या व्यक्तीने केली की अनोळखी व्यक्तीने केली, तिच्या हत्येमागे कौटुंबिक कारण आहे का, यासह अन्य शक्यतांच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी अनेकांची चौकशी केली. मात्र, यश आले नाही.
या दरम्यान पोलिसांनी मंदिराच्या परिसरात पूजेच्या साहित्याचे दुकान असलेल्या सदानंद भगवान रोडगे याला आज, १७ मे रोजी संशयावरून ताब्यात घेतले. त्याची चौकशी केली असता त्याने सुरुवातीला काहीही माहिती दिली नाही. पोलिसांनी कसून चौकशी केल्यानंतर त्याने गुन्ह्याची कबुली दिली. त्यानुसार पोलिसांनी या गुन्ह्यात संबंधित कलमांची वाढ केली असून, अधिक तपास करीत आहेत
Users Today : 0