दर्शना अहमदनगरची, तर आरोपी राहुल नाशिकचा; मग पोलिसांनी सांगितलं मर्डर मिस्ट्री..

Khozmaster
2 Min Read

राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत राज्यात तिसरी येऊन अधिकारी झालेल्या दर्शना पवारची तिचाच मित्र राहुल हंडोरेने हत्या केल्याचं स्पष्ट झालं आहे.

आरोपीने स्वतः पोलीस तपासात त्याने दर्शनाचा खून केल्याची कबुली दिली आहे.

पुणे पोलिसांनी गुरुवारी (२२ जून) पत्रकार परिषद घेत या प्रकरणातील तपासाची माहिती दिली.

विशेष म्हणजे यावेळी पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांनी अहमदनगरमधील पीडित दर्शना पवार आणि नाशिकचा आरोपी राहुल हंडोरे लहानपणापासून ओळखत असल्याचं सांगितलं.

तसेच दोन स्वतंत्र जिल्ह्यातील असूनही ते दोघे लहानपणापासून एकमेकांना कसे ओळखत होते हेही नमूद केलं.पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांनी पुण्यातील पत्रकार परिषदेत एमपीएससी उत्तीर्ण दर्शना पवार हत्येप्रकरणात नेमकं काय म्हटलं त्याचा हा आढावा…

दर्शनाच्या मामाचं घर आणि आरोपी राहुल हंडोरेचं घर समोरासमोर होतं – दोघांचं प्रेमप्रकरण होतं की नाही हे सखोल चौकशीनंतरच स्पष्ट होईल –

आम्हाला सखोल तपास करण्यासाठी वेळ मिळालेला नाही

मात्र, प्राथमिक तपासात असं दिसतंय की, दर्शना पवारने राहुल हंडोरेला लग्नासाठी नकार दिला. त्यामुळे त्याने दर्शनाचा खून केला.

दर्शनाप्रमाणे आरोपी राहुल हंडोरेही पुण्यात एमपीएससीची तयारी करत होता

तो गेल्या काही वर्षांपासून अर्धवेळ नोकरी करून स्पर्धा परीक्षेची तयारी करायचा. त्याने वेगवेगळ्या परीक्षाही दिल्या आहेत सध्या तो वेगवेगळ्या फूड डिलिव्हरी सर्व्हिसेसमध्ये काम करत होता आणि एका रुममध्ये रहात होता.

दर्शना आणि आरोपी राहुल यांच्यात आधी प्रेमसंबंध होते का, ब्रेक अप झालं का याविषयी आम्हाला आत्ताच सांगता येणार नाही –

सखोल चौकशीनंतरच त्यांचं प्रेम प्रकरण होतं की नाही हे समजू शकेल – आरोपी आणि पीडित मुलगी हे नातेवाईक नाहीत – अश्याप्रकारचा खुलासा पत्रकार परिषदेत दर्शना मर्डर मिस्ट्री मध्ये पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांनी केला.

 

0 9 3 7 6 2
Users Today : 0
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *