गावंडगाव येथे संशयास्पद मृतदेह आढळला, हत्येचा संशय*

Khozmaster
1 Min Read

प्रतिनिधी राहुल सोनोने (मळसूर)

मळसूर.चान्नी पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या गावंडगाव येथील उमेश राठोड त्याच्या राहत्या घरात सकाळी जखमी मृत अवस्थेत आढळून आल्याने खळबळ उडाली. या घटनेची माहिती परिसरातील नागरिकांनी चान्नी पोलीस स्टेशन ला दिली असता माहिती मिळतात चानी पोलीस स्टेशनचे प्रभारी ठाणेदार तसेच डी वाय एस पी विपुल पाटील आणि उपनिरीक्षक गणेश महाजन आपल्या कर्मचाऱ्यासह घटनास्थळी पोहोचले. उमेशच्या डोक्यामध्ये जबर मारहाण असल्याचे दिसून आल्याचे सांगण्यात येत आहे पोलिसांनी पंचनामा करून उमेश चा मृतदेह अकोला येथे पोस्टमार्टम करिता रवाना केला. मिळालेल्या प्राथमिक माहितीवरून उमेश चे व गावातील एका युवकाचे दारुच्या नशेमध्ये भांडण झाल्याची चर्चा आहे यावरून चाणी पोलिसांनी एकास ताब्यात घेतली असून पोस्टमार्टम चे रिपोर्ट आल्यानंतर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया होईल असे सांगण्यात आले सध्या चाणी पोलिसांनी मृतक उमेश राठोड यांची अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे पुढील तपास चांणी पोलीस करीत आहेत. या घटनेमुळे मात्र गावंडगाव परिसरात चर्चेला उधाण आले.

 

0 9 3 7 6 2
Users Today : 0
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *