बुलडाणा, प्रतिनिधी – चिखली मधील मौनीबाबा संस्थान परिसरात शिवसेनेच्या वतीने “हिंदूगर्वगर्जना” संपर्कयात्रेचे आयोजन करण्यात आले होते,
बुलढाणा जिल्हा हिंदूगर्वगर्जेनेच्या संपर्क यात्रेच्या समारोप कार्यक्रमाच्या निमित्ताने चिखली येथे *बुलढाणा जिल्ह्याचे नवनियुक्त पालकमंत्री मा.ना.श्री गुलाबराव पाटील साहेब यांच्या विराट जाहीर सभेनिमित्याने जनसभेला संबोधित करतांना बुलडाणा विधानसभा मतदार संघांचे लोकप्रिय आमदार धर्मवीर श्री संजुभाऊ गायकवाड….!
बुलढाणा व चिखली विधानसभा मतदारसंघातील निष्ठावान शिवसैनिकांच्या जाहीर मेळाव्याला शिवसेनेची मुलूख मैदानी तोफ,पाणी पुरवठा मंत्री तथा पालकमंत्री मा.ना.गुलाबराव पाटील साहेब यांनी उपस्थित राहून संबोधित केले.
मेळावा प्रंसगी शिवसेना नेते खासदार प्रतापरावजी जाधव,शिवसेना उपनेते मा.अर्जुनराव खोतकर यांनीही मार्गदर्शन केले.
हिंदुहृदयसम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे व धर्मवीर आनंद दिघे साहेब यांची हिंदूत्ववादी शिकवण अंगीकृत करून सर्वाना पुढे घेऊन चाललेले राज्याचे मुख्यमंत्री मा.ना.श्री.एकनाथ शिंदे साहेब यांनी जो ऐतिहासिक निर्णय घेतला त्याला राज्यभरातून सर्वत्र मोठ्या संख्येने पाठिंबा मिळत असून राज्यातील जिल्हे आणि तालुक्यातून कष्टकरी,शेतकरी, सर्वसामान्य नागरिकांमधून मुख्यमंत्री मा.ना.श्री.एकनाथ शिंदे साहेब यांचे प्रचंड संख्येने स्वागत करत समर्थन मिळत असल्याचे सांगितले.
राज्याचे पाणी पुरवठा मंत्री ना.श्री.गुलाबराव पाटील साहेब यांची बुलडाणा जिल्ह्याच्या पालकमंत्री पदी निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला.त्याचबरोबर शिवसेनेचा दसरा मेळावा जल्लोषात साजरा केला जाणार असून आपण सर्वांनी बहुसंख्येने या मेळाव्यास उपस्थित राहावे,असे आवाहन हि उपस्थित शिवसैनिकांना याप्रसंगी करण्यात आले.
यावेळी लोकप्रिय आमदार श्री.संजय रायमुलकर,माजी आमदार डॉ.शंशिकांत खेडेकर,शिवसेना जिल्हाप्रमुख ओमसिंग राजपूत,युवासेना जिल्हाप्रमुख ऋषी जाधव, उपजिल्हा प्रमुख भोजराज पाटील, शिवाजी देशमुख, युवासेना उपजिल्हा प्रमुख प्रवीण निमकर्डे, शिवसेना नेते संदीप गायकवाड, शिवसेना मा. शहर प्रमुख मुन्नाजी बेंडवाल,तसेच बुलडाणा व चिखली मतदारसंघातील लोकप्रतिनिधी,शिवसेना-युवासेना पदाधिकारी निष्ठावान शिवसैनिक हजारो संख्येने उपस्थित होते.
Users Today : 22