अखेर त्या अधिकाऱ्यावर कारवाई, अमर पाटील यांनी मानले पोलिस प्रशासन व पत्रकार बांधवांचे आभार
नाां नांदुरा प्रतिनिधी :-
३० एप्रिल रोजी नांदुरा येथे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीदरम्यान मतदान सुरू असताना व मतमोजणी सुरू असताना दोन्ही वेळेस नांदुरा येथे कार्यरत असलेले पोलीस उपनिरीक्षक स्वप्नील रणखांब यांनी पत्रकार संघाचे अध्यक्ष अमर पाटील यांच्यासह शुभम ढवळे व आदी पत्रकारांसोबत वाद घालून धमकी दिल्याचे गंभीर प्रकरण घडले.यानंतर बुलढाणा जिल्ह्यातील पत्रकार एकवटले व या प्रकरणाचा सर्वत्र निषेध होत विविध पत्रकार व सामाजिक संघटना अमर पाटील यांच्या मागे उभ्या राहिल्या.या प्रकरणाचे सर्वत्र पडसाद उमटले.यानंतर बुलढाणा जिल्ह्याला लभेलेल कर्तव्यदक्ष पोलिस अधीक्षक श्री सुनील कडासाने साहेब यांच्या कानावर हे प्रकरण आले.स्वप्नील रणखांब यांची यापूर्वीची पार्श्वभूमी लक्षात घेता त्यांच्यावर कारवाई करावी अशी सर्वत्र मागणी सुरू असल्याने कडासने साहेबांनी हे संपूर्ण प्रकरण लक्षात घेत पोलीस उपनिरीक्षक स्वप्नील रणखांब यांच्यावर कारवाई करत त्यांना उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या कार्यालयाला जमा केले. याबद्दल निष्पक्षपणे कारवाई करून न्याय दिल्यामुळे अमर पाटील यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक श्री सुनील कडासने साहेब यांच्यासह पोलीस प्रशासन, पत्रकार बांधव व पाठिंबा देणाऱ्या सामाजिक संघटनांचे अमर पाटील यांनी मानले आभार.
अखेर त्या अधिकाऱ्यावर कारवाई, अमर पाटील यांनी मानले पोलिस प्रशासन व पत्रकार बांधवांचे आभार
0
9
4
8
0
7
Users Today : 47
Leave a comment