धाड येथेही महाआरोग्य शिबिर

KHOZ MASTER
1 Min Read

आमदार श्वेताताई महाले यांच्या वाढदिवसानिमित्त धाड येथील विश्राम भवन येथेही भव्य महाआरोग्य शिबिर उत्साहात पार पडले. त्यांच्या सामाजिक बांधिलकीतून आणि जनसेवेच्या भावनेतून आयोजित या शिबिराला परिसरातील नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळाला.

या शिबिरामध्ये एकूण ५५० रुग्णांची मोफत तपासणी डॉक्टरांकडून करण्यात आली. ग्रामीण भागातील नागरिकांना दर्जेदार आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने आयोजित या शिबिरात विविध आजारांवर उपचार, तपासण्या तसेच वैद्यकीय मार्गदर्शन करण्यात आले.

शिबिराचे उद्घाटन अंकुशराव पाटील यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भाजपा शहराध्यक्ष अनिल कुटे यांनी केले. या शिबिरात एक्स-रे, ईसीजी, लसीकरण, गर्भवती महिलांची तपासणी, सिकल सेल तपासणी, विविध लॅब तपासण्या तसेच मोतीबिंदू ऑपरेशनसाठी रुग्णांची निवड अशा विविध वैद्यकीय सेवा देण्यात आल्या.

या उपक्रमामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला असून भविष्यातही अशाच समाजोपयोगी उपक्रमांद्वारे जनसेवा अधिक प्रभावीपणे सुरू ठेवण्याचा संकल्प यावेळी व्यक्त करण्यात आला.

या प्रसंगी देविदास जाधव, श्रीरंगअण्णा येंडोले, सुनील देशमुख, विष्णू वाघ, विष्णू उगले, विशाल विसपुते, संदीप पाटील उगले, रुईखेड सरपंच अनिल फेपाळे, बाड सरपंच सावित्रीबाई बोर्डे, योगेश राजपूत, अनिल जाधव, किरण सरोदे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

0 9 4 7 8 8
Users Today : 28
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *