चिखली :
चिखली विधानसभा मतदारसंघाच्या आमदार श्वेताताई महाले यांच्या वाढदिवसानिमित्त विविध समाजोपयोगी उपक्रमांचे आयोजन करण्यात आले असून जनसेवेचा अखंड यज्ञ सुरू असल्याचे चित्र आज पाहायला मिळाले. आमदार महाले सध्या केरळ येथे असल्या तरी त्यांच्या वाढदिवसानिमित्त चिखली ग्रामीण रुग्णालयात भव्य महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले.
या शिबिरामध्ये गरजू रुग्णांसाठी मोफत आरोग्य तपासणी, औषधोपचार तसेच आवश्यक वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देण्यात आल्या. ग्रामीण भागातील नागरिकांनी या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद देत मोठ्या संख्येने लाभ घेतला.
याच निमित्ताने चिखली येथील रेणुका माता मंदिरात माता रेणुका देवीच्या चरणी पातळ अर्पण करून आमदार श्वेताताई महाले यांच्या उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य आणि यशस्वी राजकीय वाटचालीसाठी प्रार्थना करण्यात आली. तसेच खेरूळा येथील शहा बाबा दर्ग्यावर चादर चढवून सर्वधर्मीय सलोख्याचा संदेश देण्यात आला.
या वेळी मुख्यमंत्री महोदयांचे खासगी सचिव विद्याधर महाले, अंकुशराव पाटील, नगराध्यक्ष पंडितराव देशमुख, दत्ता सुसर, वैशाली खेडेकर, कपिल खेडेकर, विनोद चव्हाण, शेख अनिस, सागर पुरोहित यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. तसेच ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक, डॉक्टर व आरोग्य कर्मचारी उपस्थित होते.
Users Today : 28