अष्टपैलू आनंदी अधिकारी प्रशासन गतिमान करताता.एसडीओ प्रा.खडसे. जिजाऊ सृष्टीवर महसूल अधिकाऱ्यांची एक दिवसीय कार्यशाळा संपन्न.

KHOZ MASTER
2 Min Read

सिंदखेडराजा :
जनसामान्यांच्या सेवेसाठी कार्यतत्पर राहणारा महसूल अधिकारी कायदे आणि नियमांबरोबर अष्टपैलू आणि आनंदी असावा. ज्यामुळे प्रशासनातील कार्याची गतिमानता वाढेल.प्रशासकीय योजना गरजवंतांपर्यंत कार्य तत्परतेने पोहोचतील. यासाठीच वरिष्ठांच्या आदेशाप्रमाणे एकदिवशीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. असे मत सिंदखेडराजा उपविभागीय अधिकारी प्रा.संजय खडसे यांनी व्यक्त केले.

स्वच्छ आणि गतिमान प्रशासन करण्यासाठी महाराष्ट्र सरकारच्या महसूल व वन विभाग अंतर्गत प्रांत स्तरावर एक दिवसीय कार्यशाळेचे निर्देश आहेत. त्यानुसार सिंदखेडराजा आणि देऊळगाव राजा तालुक्यांतील महसूल अधिकाऱ्यांसाठी 25 मार्चला जिजाऊ सृष्टी येथील भव्य सभा मंडपामध्ये महसूल अधिकाऱ्यांच्या एक दिवशीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी समारोपीय सत्रात मनोगत व्यक्त करताना एसडीओ खडसे यांनी उपरोक्त मत व्यक्त केले.
उपविभागीय अधिकारी प्रा.संजय खडसे, सिंदखेडराजा तहसीलदार अजित दिवटे, देऊळगाव राजा तहसीलदार वैशाली डोंगरजाळ, प्रबोधनकार अँड.सतीशचंद्र रोठे पाटील, अँड राजेंद्र ठोसरे,यांच्यासह नायब तहसीलदार डॉ.प्रवीण कुमार वराडे, सायली जाधव, इंजि. निलेश शिंगणे, शिवानंद वाकदकर, अँड.ऋषिकेश अटोळे, गौरी निकाळजे आदींनी उपस्थिती लावत नियोजित विषयावर अभ्यासपूर्ण प्रशिक्षण दिले.
यावेळी बहारदार संचालन शिवानंद वाकदकर यांनी केले.
_

परिवारातूनच आनंदाची आणि आत्मविश्वासाची निर्मिती होते. अँड.रोठे पाटील

आनंददायी जीवनासाठी संस्कारांची पेरणी महत्त्वपूर्ण आहे. परिवारातील शांतता आणि एकमेका प्रति असलेली आपुलकीची भावना जीवनाला प्रफुल्लित आणि आशादायी करते. तेंव्हाच आपण आनंददायी जीवन जगून गतिमान प्रशासन राबवू शकतो. असे मत प्रख्यात प्रबोधनकार अँड सतीशचंद्र रोठे पाटील यांनी व्यक्त केले.आनंददायी जीवन व आनंददायी प्रशासन कसे करावे. या विषयावर प्रशिक्षक म्हणून व्यक्त होतांना अँड रोठेंनी आपल्या खास शैलीतील वास्तविक उदाहरणांसह कार्यशाळेत एक तास हास्यांचे फवारे आनंददायी जीवनासाठी लागणाऱ्या आत्मविश्वासाची पायाभरणी करणारे ठरले.

0 9 4 7 9 9
Users Today : 39
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *