रामनवमीनिमित्त मोताळ्यात शोभायात्रा उत्साहात

KHOZ MASTER
1 Min Read

मोताळा :
रामनवमीच्या निमित्ताने मोताळा शहरात सियाराम मित्र मंडळ व रामभक्तांच्या वतीने भव्य शोभायात्रा काढून श्रीराम जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. शहरातील प्रभाग क्रमांक ५ मध्ये आयोजित कार्यक्रमाला हजारो भाविकांनी उपस्थिती लावली.

कार्यक्रमाची सुरुवात रामभक्तांच्या हस्ते प्रभू श्रीरामांच्या आरतीने करण्यात आली. यावेळी महिला भगिनींनी प्रभू श्रीरामचंद्रांच्या भक्तिगीते सादर करत रामाचा पाळणा गाऊन वातावरण भक्तिमय केले. त्यानंतर महिला व पुरुष भाविकांना शिस्तबद्ध पद्धतीने प्रसादाचे वाटप करण्यात आले.

दरम्यान, नांदुरा रोडवरील हनुमान संस्थान संकुल, दुर्गानगर येथे सियाराम मित्र मंडळ व रामभक्तांच्या वतीने प्रभू श्रीरामचंद्रांच्या भव्य मूर्तीला हार अर्पण करून दर्शन घेण्यात आले. त्यानंतर आठवडी बाजारातून रथात श्रीराम प्रभूंची भव्य मूर्ती विराजमान करून डीजेच्या निनादात आठवडी बाजार ते मोताळा फाटा दरम्यान भव्य शोभायात्रा काढण्यात आली.

शोभायात्रेच्या स्वागतासाठी महिलांनी सडा-संमार्जन करून आकर्षक रांगोळ्या काढल्या होत्या. मिरवणुकीत महिला व मुलींचा मोठ्या संख्येने सहभाग होता. या शोभायात्रेचे नियोजन सियाराम मित्र मंडळ व समस्त रामभक्तांच्या वतीने करण्यात आले होते.

या मिरवणुकीदरम्यान बोराखेडी पोलिस स्टेशनचे ठाणेदार सिताराम मेहेत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय राजेंद्र कपले यांच्यासह पोलिस व होमगार्डचा मोठा फौजफाटा बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आला होता. 🚩🙏

0 9 4 7 8 8
Users Today : 28
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *