अठरा वर्षीय ऋषिकेशची गळफास घेऊन आत्महत्या

Khozmaster
1 Min Read

अठरा वर्षीय ऋषिकेशची गळफास घेऊन आत्महत्या

नांदुरा/प्रतिनिधी:- नांदुरा शहरातील ऋषिकेश दिनकर बावस्कार या १८ वर्षीय युवकाने २१ जुलै रोजी दुपारी दीड वाजता राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली. ऋषिकेशचे काका श्री प्रभाकर श्यमराव बावस्कार यांनी नांदुरा पोलीस स्टेशनला दिलेल्या माहितीनुसार मृतक ऋषीकेश दिनकर बावस्कार वय १८ वर्ष रा. अर्बन कॉलनी जवळ नांदुरा ता.नांदुरा याने त्याचे राहते घरात अॅगलला लेडीज स्टॉलने गळफास घेवुन आत्महत्या केली व त्यास शेजारील लोकांनी प्राथमिक आरोग्य केंद्र नांदुरा येथे नेले असता मा.वैद्यकिय अधिकारी यांनी तपासुन ऋषिकेश मरण पावल्याचे सांगितले. तसेच त्याबाबत प्रा. आ. केंद्र नांदुरा येथुन प्राप्त माहितीवरून नांदुरा पोलीस स्टेशनला २९/१७४ मर्ग दाखल करण्यात आला आहे.

0 9 4 8 0 7
Users Today : 47
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *