मलकापूर शहरातील हायवे क्रमांक सहा वर भीषण अपघात:  दोन ट्राव्हल्स समोरासमोर धडकल्याने  6 प्रवाशांचा मृत्यू तर 25 ते 30 प्रवासी जखमी, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता…

Khozmaster
2 Min Read

मलकापूर शहरातील हायवे क्रमांक सहा वर भीषण अपघात:  दोन ट्राव्हल्स समोरासमोर धडकल्याने  6 प्रवाशांचा मृत्यू तर 25 ते 30 प्रवासी जखमी, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता…

मलकापूर (श्रीकांत हिवाळे):-  मलकापूर शहरातील  लक्ष्मी नगर जवळील नॅशनल हायवे क्रमांक सहावर असलेल्या उड्डाण पुलावर भीषण अपघात घडला. भरधाव वेगात असलेल्या दोन ट्राव्हल्स बस एकमेकांवर आदळल्या. या अपघातामध्ये एकूण सहा प्रवासी ठार झाले असून 25 ते 30 प्रवासी काही गंभीर तर काही किरकोळ जखमी झाले आहेत. जखमी प्रवाशांवर बुलढाणा येथील सामान्य रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार आज 29 जुलै रोजी पहाटे 3 वाजेच्या सुमारास दोन्ही बसमध्ये टक्कर झाली. यातील एक लक्झरी बस (एमएच 08-9458) रॉयल कंपनीची असून दुसरी बस यात्रेकरूंची होती. अमरनाथ यात्रा संपवून ही लक्झरी बस (एमएच 27 बिएक्स 4466) हिंगोलीच्या दिशेने जात होती. तर रॉयल कंपनीची बस नागपूरकडून नाशिकच्या दिशेने रवाना होत असल्याची माहिती मिळाली आहे. अपघातानंतर मिळालेल्या माहितीनुसार तीर्थयात्रींच्या बसमधील ड्रायव्हर सुद्धा या अपघातात ठार झाला आहे. घटनास्थळी एकूण 5 प्रवासी ठार झाले आहे ,तर 1 प्रवासी जिल्हा सामान्य रुग्णालय बुलढाणा या ठिकाणी दगावल्याची माहिती समोर येत आहे. मृतांची संख्या वाढण्याची शक्यता आहे.
या घटनेची माहिती मिळताच शहर पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक अशोक रत्नपारखी सह कर्मचारी घटनास्थळी दाखल होऊन मदत कार्य सुरू करून जख्मीनां पोलीसांच्या वाहनाने मलकापूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.तर गंभीर जख्मीनां बुलढाणा जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले.
जिल्हा पोलीस अधिक्षक सुनीलजी कडासने साहेब,
अप्पर पोलीस अधिक्षक अशोक थोरात,
उपविभागीय पोलिस अधिकारी गवळी सह आदींनी घटनास्थळी भेट देऊन जख्मींची विचारपूस केली.

0 9 4 8 0 7
Users Today : 47
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *