पिंपळगाव कुडा येथे साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांना अभिवादन

Khozmaster
2 Min Read

सिंदखेडराजा सुरेश हुसे सिंदखेडराजा तालुक्यातील पिंपळगाव कुडा येथे साहित्य रत्न लोकशाहीर डॉ. अण्णा भाऊ साठे यांची १०३ वी जयंती साजरी करण्यात आली. यावेळी प्रथम मंचकावर उपस्थितांनी थोर महापुरुषांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून व पूजन करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.प्रस्ताविक कार्यक्रमासाठी प्रमुख वक्ते म्हणून आलेले मातंग समाज अन्याय निवारण समितीचे राज्य प्रवक्ते विलास साबळे यांनी केले. त्यांनी समाजाला अत्यंत मोलाचे मार्गदर्शन करतांना शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले व समाजाच्या विविध समस्या उपस्थितांसमोर मांडल्या. याचबरोबर भाई दिलीप खरात,जि.एस. देशमुख सर व लोकजागर परिवाराचे प्रविण गिते यांनीही समाजाला विविध विषयांवर मोलाचे मार्गदर्शन केले. यावेळी कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून स्थानिक सरपंच गणेश कुडे हे लाभले होते. मंचकावर उपस्थितांमधे भाई दिलीप खरात, विलास साबळे जि.एस. देशमुख सर,प्रविण गीते,उत्तम मिसाळ, सरपंच गणेश कुडे,शुभम पव्हरे, रमेशराव तौर, विवेक जाधव, दत्तात्रय कुडे,किशोर पाडमुख,सतिष कांबळे, देवानंद धोंगडे,बाळु गायकवाड, गजानन गायकवाड,विशाल मिसाळ,सय्यद आपु, गजानन उंबरे, विवेक जाधव, विठ्ठल बिथरे,बालाजी अवसरमोल,राजु अवसरमोल होते. कार्यक्रमाला मोलाचे सहकार्य विश्वनाथ तौर यांनी केले तर कार्यक्रम यशस्वीतेसाठी घनश्याम तौर, सुनील तौर,सहदेव तौर,संतोष तौर,संजय तौर, भाऊराव तौर, श्रीकांत तौर,श्रीनाथ तौर, सुर्यकांत तौर, अजय वि.तौर, अजय सु.तौर,रवी तौर,दत्ता तौर, आदित्य तौर,योगेश तौर, दिपक तौर,गणेश तौर,पवण तौर,श्रावण लांडगे, विशाल लांडगे,प्रेम तौर,आशिष तौर,गजानन त़ौर,शुभम तौर, ओमकार तौर, लक्ष्मी तौर, अनुराधा तौर,प्रतिभा तौर या सर्वांनी प्रयत्न केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन पत्रकार अरुण तौर यांनी केले.

 

0 9 4 8 0 7
Users Today : 47
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *