सखी वन स्टॉप सेंटरचे उत्कृष्ट व्यवस्थापन करावे -जिल्हाधिकारी डॉ. ह. पि. तुम्मोड

Khozmaster
2 Min Read

बुलडाणा, दि. 8 : जिल्ह्यात संकटग्रस्त महिला आणि बालकांच्या निवाऱ्यासाठी सखी वन स्टॉप सेंटर उभारण्यात आले आहे. सध्या स्वयंसेवी संस्थेतर्फे सेंटर चालविण्यात येत आहे. शासनाच्या निर्णयानुसार आता व्यवस्थापन समिती सेंटरची देखरेख करणार आहे. या समितीने सेंटरचे उत्कृष्‍ट व्यवस्थापन करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. ह. पि. तुम्मोड यांनी दिले.                                                                सखी वन स्टॉप सेंटर कार्यान्वित करण्यासंदर्भात शासनाने नवे निर्देश दिले आहेत. याबाबत जिल्हाधिकारी यांनी आढावा घेतला. यावेळी जिल्हा महिला व बालविकास अधिकारी अमोल डिघुळे, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी दिवेश मराठे, कृषी समृद्धी मल्टीपर्पज फाउंडेशनचे महेंद्र सौभागे आदी उपस्थित होते.                                     जिल्हाधिकारी डॉ. तुम्मोड म्हणाले, सखी वन स्टॉप सेंटर ही संकटग्रस्त महिला आणि 12 वर्षाखालील मुलांना आश्रय देण्यात येतो. कौटुंबिक हिंसाचार पिडीत, लैंगिक शोषणाच्या पिडीत, मानवी वाहतुकीस बळी पडलेल्या महिलांना वैद्यकीय सुविधा, पोलिस मदत आणि समुपदेशन व कायदेशिर मदत उपलब्ध करून देण्यात येते. आतापर्यंत 204 महिलांना या ठिकाणी मदत करण्यात आली आहे. सेंटर सुरळीत चालण्यासाठी आतापर्यंत कृषी समृद्धी मल्टीपर्पज फाउंडेशन या स्वयंसेवी संस्थेची मदत घेण्यात आली. मात्र नव्या निर्देशानुसार आता शासनाला या सेंटरचे व्यवस्थापन करावे लागणार आहे. मदत करणाऱ्या स्वयंसेवी संस्थांना कोणताही मोबदला देण्यात येणार नाही.

  • सेंटरमध्ये आश्रय देण्यात येणाऱ्या महिलांना वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून द्यावी. महिलांना चांगला आहार मिळावा, यासाठी पुरवठादाराची नियुक्ती करण्यात यावी. या महिलांना सेवा-सुविधा दिल्यानंतर या महिलांचा काही काळ मागोवा घेण्यात यावा. तसेच सेंटरच्या बांधकामासाठी जागा उपलब्ध करून घ्यावी. इमारतीचे बांधकाम झाल्यास याठिकाणी योग्य सुविधा उपलब्ध करून देणे शक्य होईल. या ठिकाणी बालगुन्हेगार आणि मनोरूग्ण ठेवता येत नाही. बालगुन्हेगांराना याठिकाणी ठेवायचे असल्यास त्याचे पत्र देण्यात यावे. तसेच या ठिकाणी कार्यरत कर्मचाऱ्यांचे नियमित मानधन देण्यात यावे, असे निर्देशही जिल्हाधिकारी यांनी यावेळी दिले.
0 9 4 8 0 7
Users Today : 47
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *