इस्माईल शेख शेगाव शहर प्रतिनिधी बुलढाणा व अकोला जिल्ह्यातील अनेक गावातील रुग्णांची गर्दी असणाऱ्या शेगाव शहरातील सईबाई मोठे उपजिल्हा सामान्य रुग्णालय येथे सोनोग्राफी मशीन बंद असल्याने महिलांना त्रास सहन करावा लागतो अनेक पदे रिक्त असल्याने रुग्णालयातील सोनोग्राफी विभाग शोपीस झालेले आहे सदर सोनोग्राफी विभागातील टेक्निकल कर्मचाऱ्यांची तत्काळ नियुक्ती करून सदर विभाग तत्काळ सुरू करावा अशी मागणी आरोग्य सेवक मोहम्मद सलमान यांनी केली आहे आज नऊ ऑगस्ट रोजी शेगाव येथील सईबाई मोठे रुग्णालयात सोनोग्राफी करण्यासाठी मोठ्या संख्येने महिला रुग्ण आलेल्या होत्या मात्र सदर विभागातील कर्मचारी व संबंधित अधिकारी नसल्याने सोनोग्राफी बंद होती त्यामुळे महिला रुग्णांना मानसिक शारीरिक त्रास सहन करावा लागला आरोग्य विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या बाबीची तत्काळ दखल घ्यावी अन्यथा आरोग्य सेवक मोहम्मद सलमान व त्यांचे सहकारी आंदोलन करणार असा इशारा आरोग्य सेवक मोहम्मद सलमान यांनी दिला आहे.
Users Today : 11