जलम येथील रेल्वे स्टेशन चा समावेश अमृत भारत स्टेशन विकास योजनेमध्ये करा . राष्ट्रीय रेल्वे महिला प्रवासी संघटनेची मागणी

Khozmaster
2 Min Read

इस्माईल शेख शेगाव शहर प्रतिनिधी – मध्य रेल्वेच्या भुसावल डिव्हिजन मधील मुंबई कोलकत्ता लोहमार्गावर असलेल्या जलम रेल्वे स्टेशनचा अमृत भारत रेल्वे स्टेशन योजनेमध्ये समावेश करण्यात यावा अशी मागणी राष्ट्रीय रेल्वे महिला प्रवासी संघटनेने केली आहे अशा मागणीचे निवेदन शेगाव रेल्वे स्टेशन येथे राष्ट्रीय रेल्वे महिला प्रवासी संघटनेच्या वतीने रेल्वे स्टेशनचे प्रबंधक मोहन देशपांडे व ट्रॅफिक इन्चार्ज पीएम पुंडकर यांच्या माध्यमातून प्रधानमंत्री नरेंद्र जी मोदी यांना आज पाठविण्यात आले .शेगाव येथील रेल्वे स्टेशनवर रेल्वे स्टेशन प्रबंधक क मोहन देशपांडे व ट्रॅफिक इन्चार्ज पीएम पुंडकर यांना देण्यात आले प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना पाठविण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की अतिशय जुन्या काळापासून जंक्शन असलेले जलम रेल्वे स्टेशन ला अत्याधुनिक रेल्वे स्टेशन बनविण्याकरिता व प्रवाशांना सर्वसोयी उपलब्ध होण्यासाठी जलम रेल्वे स्टेशन चा समावेश अमृत भारत रेल्वे स्टेशन विकास योजनेत मध्ये करावा असेही या निवेदनात म्हटले आहे निवेदनाच्या प्रती केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी जी वैष्णव केंद्रीय परिवहन मंत्री नितीनजी गडकरी, केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे पाटील खासदार प्रतापराव जाधव रेल्वे विभागाच्या मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक या लोकप्रतिनिधी व रेल्वे विभागातील अधिकाऱ्यांना डी आर एम भुसावळ येथे पांडे मॅडम आदींना पाठविण्यात आले आहे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना पाठविण्यात आलेल्या या निवेदना वर राष्ट्रीय रेल्वे महिला प्रवासी संघटनेच्या राष्ट्रीय अध्यक्ष माधुरी शर्मा राष्ट्रीय रेल्वे महिला प्रवासी संघटनेच्या बुलढाणा जिल्हा उपाध्यक्ष प्रणिती धामंदे संघटक अलका बांगर लीना भारंबे पाटील युवा ब्रिगेड अध्यक्ष कुसुम रितेश चव्हाण सामाजिक कार्यकर्ते श्रीधर पाटील गायकवाड यांच्यासह राष्ट्रीय रेल्वे महिला प्रवासी संघटनेच्या अनेक पदाधिकारी व सदस्य महिला उपस्थित होत्या.

 

0 9 4 8 0 7
Users Today : 47
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *