बुलडाणा : राज्यातील मुस्लिम शाह फकीर या जातीचा समावेश भटक्या विमुक्त प्रवर्गात करण्यात यावा या मागणी करिता मुस्लिम शाह फकीर समाज संघटना महाराष्ट्र च्या वतीने आज क्रांती दिन 9 ऑगस्ट 2023 रोजी मोताळा बस स्थानक चौकात प्रचंड स्वरूपात जेल भरो आंदोलन करण्यात आले. राज्यातील मुस्लीम शाह फकीर या जातीचा समावेश भटक्या विमुक्त प्रवर्गामध्ये महाराष्ट्र शासनाने अग्रक्रमाने करावा, या महत्वपुर्ण मागणी बाबत संघटनेच्या वतीने जिल्हाव्यापी “रास्ता रोको, जेल भरो आंदोलन करण्यात येणार आहे. सदरच्या जिल्हाव्यापी “रास्ता रोको, जेल भरो आंदोलनाची सुरवात आज क्रांती दिन 9 ऑगस्ट 2023 रोजी मोताळा येथुन करण्यात आली. यावेळी मोताळा तहसीलदार यांच्या मार्फत मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांना देण्यात आलेल्या निवेदनात नमुद आहे. की राज्यातील मुस्लीम शाह फकीर या जातीचा समावेश भटक्या विमुक्त प्रवर्गामध्ये महाराष्ट्र शासनाने अग्रक्रमाने करावा, या महत्वपुर्ण मागणी बाबत राज्यस्तरावर व जिल्हास्तरावर मोठ्या प्रमाणात आंदोलने करण्यात आली. परंतू राज्यातील शासनाने त्याची अद्यापपर्यंत कोणतीही दखल न घेतल्यामुळे राज्यात मुस्लीम शाह फकीर समाजामध्ये प्रचंड रोष आहे. शासनाने या मागणीच्या संदर्भात संघटनेने वेळोवेळी दिलेले निवेदने व पुरावे याची दखल न घेतल्यामुळे बुलडाणा जिल्ह्यात दिनांक 9 ऑगस्ट 2023 रोजी मोताळा येथे जिल्हाव्यापी “जेल भरो आंदोलन” करण्यात येत आहे. शासनाने या आंदोलनाची तात्काळ दखल घेऊन समाजाला न्याय देण्यात यावा अशी मागणी निवेदनाच्या अंती करण्यात आली आहे.
यावेळी आंदोलनात संस्थापक अध्यक्ष के.जी.शाह, संस्थापक महासचिव जाकीर शाह, महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष लुकमान शाह, विदर्भ अध्यक्ष मुश्ताक शाह, युवा आघाडी विदर्भ अध्यक्ष अकिल शाह, बुलडाणा जिल्हा अध्यक्ष तहेसिन शाह, युवा आघाडी जिल्हा अध्यक्ष सईद शाह, सरदार शाह, तुराब शाह, एजाज शाह, जाकीर शाह, लुकमान शाह, आलिम शाह, अली शाह, मासुम शाह, बाबा शाह, शौकत शाह, अय्युब शाह, यासीन शाह, मन्सूर शाह, हाजी आवेज शाह यांच्या सह संघटनेच्या पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. आंदोलना दरम्यान बोराखेडी पोलीस निरीक्षक बळीराम गिते यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचाऱ्यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.
Users Today : 47