सिंदखेडराजा तालुक्यातील बोगस अपंग प्रमाणपत्र मिळवून नोकरी लाटणाऱ्या जि प . शिक्षकांची होणार चौकशी -बबन सरकटे यांचे गटशिक्षणाधिकारी यांना निवेदन !

Khozmaster
1 Min Read

सिंदखेडराजा एकनाथ माळेकर मोठ्या प्रमाणामध्ये बुलढाणा जिल्ह्यातील काही शिक्षकांनी तत्कालीन बुलढाणा जिल्हा शल्य चिकित्सक यांच्याकडून लाखो रुपये देऊन बनावट अपंग प्रमाणपत्र मिळवली आहे व त्या आधारावर त्यांनी शासनाचे लाखो रुपयांची फसवणूक सुद्धा केली आहे ‘अपंग प्रमाणपत्र मिळून शासनाचा भत्ता असेल त्याचबरोबर शासनाच्या इतर कामकाजामध्ये त्यांना कुठल्याही प्रकारचे काम सांगता येत नाही असे कामातून सूट सुद्धा त्यांना मिळते ‘हवे तेथे मनासारखे बदली करून घेता येते .प्रवास भत्ता सुद्धा मिळतो ‘त्यामुळे सिनखेडराजा तालुक्यातील काही बोगस शिक्षक हे अपंग प्रमाणपत्र मिळून नोकरी करत आहे ‘अपंग प्रमाणपत्र च्या जोरावर त्यांनी विविध प्रकारचा लाभ सुद्धा घेतला आहे ‘यामध्ये प्रमोशन असेल ‘इतर शासनाच्या सुख सुविधेचा लाभ त्यांनी घेतला आहे ‘त्यामुळे खऱ्या अर्थाने सुशिक्षित तरुण हे नोकरी पासून वंचित राहिली आहे ‘त्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी करावी अशी मागणी बबन सरकटे यांनी दिनांक 5 ऑगस्ट रोजी गटशिक्षणाधिकारी रघुनाथ गावंडे यांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे ‘व गटशिक्षणाधिकारी रघुनाथ गावंडे यांनी सुद्धा बोगस प्रमाणपत्र मिळून शासनाची फसवणूक करणाऱ्या शिक्षकाची चौकशी करण्याचे आश्वासन दिले ‘जळगाव राजा तालुक्यातील बोगस प्रमाणपत्र मिळवणाऱ्या शिक्षकांची चौकशी सुरू आहे त्याचप्रमाणे सिनखेडराजा तालुक्यात सुद्धा लवकरच चौकशी होईल अशी आशा सरकटे यांनी व्यक्त केली आहे ‘

 

0 9 4 8 0 7
Users Today : 47
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *