कृषी केंद्र चालकांनी शेतकऱ्यांना रासायनिक खते देतांनी लिंकिंगचा आग्रह धरू नये

Khozmaster
1 Min Read

जळगाव जा.युरिया खत खरेदी करत असतानां अनेक ठिकाणी लिंकिंग चा आग्रह धरला जातो. शेतकऱ्यांनी खते व कीटकनाशके खरेदी करण्यासाठी लगबग सुरू केली. त्यातच रासायनिक खत उत्पादक कंपन्या व काही खत विक्रेते हे जबरदस्तीने लिंकिंग करून शेतकऱ्यांना लागत नसलेले उत्पादने गरज नसतानाही शेतकऱ्यांच्या माथी मारले जात असल्याची तक्रार अनेक वेळा जळगाव जामोद तालुक्यातील शेतकरी करत आहे.

अनेक शेतकरी कृषी युरिया खत मागत असताना काही कृषी केंद्र चालकांकडे खताचा स्टॉक असताना युरिया खत देत नाहीत. तर काही ठिकाणी लिंकिंग खताचा आग्रह धरला जातो तरच युरिया उपलब्ध करून देतो असे कृषी केंद्र चालकाकडून सांगितले जाते.

दिनांक २६/७/२०२३ ला गुणवत्ता नियंत्रण अधिकारी कृषी आयुक्तालय पुणे यांनी सर्व खत उत्पादक विक्रेते यांना रासायनिक खतांवरील लिंकिंग न करण्याबाबत पत्र सुद्धा काढलेले आहे.

तरीसुद्धा काही ठिकाणी अशा स्वरूपाचे प्रकरणे तालुक्यात होत आहे. ही बाब लक्षात घेता युवा आंदोलक अक्षय पाटील यांनी तालुका कृषी अधिकारी जळगाव जामोद वाकडे साहेब यांना भेटून सांगितली.

यावेळी तालुक्यातील अशपाक देशमुख, अजय गिरी‌ व इतर शेतकरी उपस्थित होते.

 

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *