लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त…

Khozmaster
1 Min Read

चिखली :- उद्या चिखलीतील शेलुद येथे सुप्रसिद्ध गायक चंदन कांबळे यांचा बहारदार गीतांचा जंगी कार्यक्रम सर्व समाज बांधवानी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन :- आयोजक चिखली :- साहित्यरत्न, लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या १०३ व्या जयंतीनिमित्त चिखली तालुक्यातील शेलुद जवळील भव्य जयस्वाल मंगल कार्यालय येथे महाराष्ट्राचे लाडके सुप्रसिद्ध गायक चंदन कांबळे यांच्या अण्णाभाऊ साठे यांच्यावरील बहारदार गीतांचा जंगी कार्यक्रमाचे आयोजन उद्या दि. ११ ऑगस्ट रोजी सायं.०४ वाजता करण्यात आले असून या कार्यक्रमाचे उद्घाटक चिखली विधानसभा मतदारसंघाच्या लोकप्रिय आमदार सौ. श्वेताताई महाले पाटील तर कार्यक्रमाचे अध्यक्ष चिखली पंचायत समिती माजी सभापती सौ. सिंधुताई तायडे राहणार आहे. वीर लहुजी आखाडा शेलुद व सकल मातंग समाज चिखली तालुका व चिखली विधानसभा यांच्या संयुक्त विद्यमाने या बहारदार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे . तरी सर्व जनतेनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

0 9 4 8 1 9
Users Today : 59
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *