प्रकाश सोळंके मनसे जिल्हाध्यक्ष जालना गजानन माळकर जालना जिल्हा प्रतिनिधी मंठा.मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद जालना यांच्याकडे दि.7/8/2023 रोजी.ई-मेल द्वारे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने तक्रार करून तक्रारी पुढे म्हटले आहे की, तालुका परतुर येथे गटशिक्षण अधिकारी कार्यालयात गट समन्वयक म्हणून श्री कल्याण बागल यांची कोणत्या आधारावर नियुक्ती झाली,कारण कल्याण बागल हे शिक्षक म्हणून दहिफळ भोंगाने या ठिकाणी कार्यरत आहेत, ज्या शाळेच्या विद्यार्थ्यांना शिकवायला शिक्षक नाहीत,अशा शाळेवरील शिक्षकाला डेपुटेशन वरती इतर ठिकाणी घेऊन एक प्रकारे राजकीय षडयंत्र आहे,या मुळे त्या गावातील अनेक लोकांनी तोंडी तक्रारी करून आमच्या शाळेतील शिक्षक श्री कल्याण बागल हा शिक्षक अनेक वर्षापासून शाळेत एक दिवस ही येत नाही,परंतु श्री बागल तालुक्याच्या राजकारणात रात्रंदिवस मग्न असतात, याचे उत्तम उदाहरण त्यांनी गटशिक्षण अधिकारी कार्यालयात स्वतःसाठी प्रशस्त कॅबिन तयार करून घेतले जेणेकरून त्यांना शिक्षकांच्या माध्यमातून राजकारण करायला सोपे जाईल,खासबाब म्हणजे त्यांनी वाढदिवसानिमित्त गटसाधन केंद्राचे खाजगीकरण करून राजकीय पुढार्यांना लाजवील असे स्वतःचे बॅनर फोटो लावून कार्यालय निर्माण केले, परंतु भोंगाने दहिफळ शाळेत न जाणाऱ्या व खोटी गट समन्वय पदवी घेऊन वसुली प्रतिनिधी म्हणून त्यांची ख्याती आहे, अनेक शिक्षकांच्या ज्या काही अडचणी असतात त्या शिक्षकाच्या कामासाठी हजारो रुपये घेतले जातात असे अनेक उदाहरणं आहेत, श्री कल्याण बागल परतुर शहरातील रहिवासी असून त्यांची बदली भोकरदन या ठिकाणी व्हावी कारण ते परतुर शहराचे रहिवासी असल्यामुळे अनेक शिक्षकांना त्यांचा मनस्ताप होतो. शेवटी असेही सोळंके यांनी तक्रारीत नमूद केले आहे, श्री बागल यांच्यावर कारवाई करण्यास टाळाटाळ झाली तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने गटशिक्षण अधिकारी परतुर यांच्या कार्यालयासमोर तीव्र आंदोलन करण्यात येईल याची नोंद घ्यावी अशा प्रकारचा उल्लेख निवेदनाच्या शेवटी केलेला आहे.