चिखली/ प्रतिनिधी चिखली शहरातील प्रभाग क्रं.12 गजानन नगर मधील नागरीकांना मुख्यबाजार पेठेत येण्या-जाण्यासाठी असलेल्या गजानन महाराज मंदिर ते मुख्यरस्ता तसेच धनवे हॉस्पीटल पर्यंत रस्ता हे दोन्ही रस्त्यांचे काम अनेक दिवसांपासून रखडलेले आहे. त्या रस्त्याचे काम त्वरीत करण्यात यावे अन्यथा शिवसेनेच्यावतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असे निवेदन शिवसेना चिखली शहर उपप्रमुख राहुल वरवंडे यांनी मुख्याधिकारी नगर परिषद चिखली यांना दिले आहे.
सदर निवेदनात असे नमुद करण्यात आले आहे की, प्रभाग क्रं.12 येथील रहिवासी यांना मुख्यरस्त्यावर तसेच बस स्थानक, दवाखाना, तहसिल कार्यालय, पंचायत समिती, नगर परिषद, व मुख्य बाजारपेठेत येण्यासाठी दोन रस्ते आहेत. पैकी एका रस्त्याचे काम रखडलेले आहे. तर डॉ.धनवे दवाखान्याजवळील मुख्य रस्त्याला जोडणार्या रस्त्यामध्ये काही लोकांचे मालकीचे प्लॉट येत असल्याने या रस्त्याचे काम अर्धवट थांबले असून प्रशासनाने यावरील दोन्ही रस्त्याचे काम तातडीने मार्गी लावावे अन्यथा शिवसेना शहर प्रमुख श्रीराम झोरे यांच्या नेतृत्वामध्ये लोकशाही मार्गाने आंदोलन छेडण्यात येईल असा इशारासुध्दा या निवेदनात देण्यात आला आहे.
निवेदन देतेवेळी युवसेना शहरप्रमुख आनंद गैची, शिवसेना उपशहरप्रमुख रवीआप्पा पेटकर, शिवसेना उपशहरप्रमुख समाधान जाधव, युवासेना उपशहरप्रमुख बंडू नेमाने, शिवसेना उपशहरप्रमुख संतोष देशमुख, सनी जमधाडे, मंगेश तायडे, मंगेश गिर्हे,शे.जमीर, विशाल सवडतकर, विकास सवडतकर, अनिकेत महाजन, रामदास काकडे, चंद्रकुमार लालवाणी, रोषनी नितीन शिंदे, कमल यंगड, पुष्पा इंगळे, आंनद गुंजाळकर, बंडू गारडे, गणेश इंगळे आदी शिवसैनिक व नागरीक उपस्थित होते.
Users Today : 59