तळणी व ऊस्वद देवठाण येथे मा मंत्री व आमदार बबनराव लोणीकर यांच्या हस्ते विविध कामाचे उद्घाटन.

Khozmaster
5 Min Read

गजानन माळकर जालना जिल्हा  प्रतिनिधी मंठा.पर्यावरणाचा समतोल व्यवस्थित राखण्यासाठी वृक्षांची संख्या कमी होऊन चालणार नाही. वृक्ष हे पर्यावरणातील खूप महत्वाचा भाग आहेत. आपल्या भोवताली असलेली झाडे आपल्याला फक्त सावली देत नाहीत तर वृक्षांपासून आपल्याला अनेक फायदे आहेत. वृक्ष वातावरणातील कार्बन डायऑक्साइड स्वतःकडे घेतात आणि जीवनावश्यक असा अक्सिजन आपल्याला देतात. म्हणून पंतप्रधान नरेंद्र जी मोदी यांच्या संकल्पनेतून राज्याचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे उपमुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस आणि वनमंत्री नामदार सुधीरभाऊ मनगुंटीवार यांच्या मार्गदर्शनाखाली परतूर विधानसभा मतदार संघातील अनेक गावात लाखो वृक्ष लागवडीचे काम मेरी माटी मेरा देश या अभियानांतर्गत चालू आहे. असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्याचे माजी पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा परतूर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार बबनराव लोणीकर यांनी केले. महाराष्ट्र जीवन प्राधिकरण आयोजित जल जीवन मिशन अंतर्गत 120 गावे विस्तारित पाणी पुरवठा योजनेतून मंठा तालुक्यातील देवठाणा येथे 180 लक्ष रुपये किमतीचे 01 लाख 43 हजार लिटर क्षमता असलेल्या जलकुंभ बांधकामाचे आणी तळणी तालुका मंठा येथील 03 लक्ष 10 हजार लिटर क्षमता असलेल्या 210 लक्ष रुपये किंमत असलेल्या नवीन जलकुंभ बांधकामाचे आणी पाणीपुरवठा पाईपलाईनचे भूमिपूजन सोहळा व दलित वस्ती मध्ये 20 लक्ष रुपये किमतीच्या अंतर्गत सिमेंट रस्त्याच्या उदघाटन आणी अमृत महोत्सव निमित्त आयोजित मेरी माटी मेरा देश अभियान सोहळ्याचे आयोजन तळणी तालुका मंठा येथे करण्यात आले होते याप्रसंगी ते बोलत होते.

पुढे बोलताना आमदार बबनराव लोणीकर म्हणाले

मराठवाडा वॉटर ग्रीड योजनेच्या माध्यमातून महाराष्ट्र जीवन प्राधिकरण जल जीवन मिशन अंतर्गत 120 गावे विस्तारित पाणी पुरवठा योजनेतून गावागावात पिण्याचे शुद्ध पाणी घराघरात पोहोचविण्याचा उद्देश साध्य करण्याच्या हेतूने मतदारसंघातील 70 गावात नवीन मोठमोठे जलकुंभ मंजूर झाले असून येत्या पंधरा दिवसात सर्व जलकुंभा च्या कामास सुरुवात होणार आहे. या जलकुंभाना पाणीपुरवठा करण्याकरिता विस्तृत पाईपलाईन टाकण्यात येत आहे.

यावेळी देवठाणा येथे जगद्गुरु संत तुकाराम महाराज मंदिराकरिता माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी स्थानिक विकास निधीतून दहा लक्ष रुपयाचे सभागृहास मंजुरी दिल्याने सदरील सभागृहाचे भूमिपूजनही लोणीकर साहेबांच्या शुभहस्ते या वेळी संपन झाले. अमृत महोत्सवानिमित्त मेरी माटी मेरा देश अभियानाबद्दल बोलताना आमदार लोणीकर पुढे म्हणाले की शूरवीरांना श्रद्धांजलीपासून गावात युद्ध स्मारक उभारण्यापर्यंत अशा अनेक महत्त्वाच्या गोष्टींचा या अभियानात समावेश करण्यात आला आहे.

मेरी माटी मेरा देश’ अभियाना अंतर्गत देशाच्या स्वातंत्र्य दिनापर्यंत म्हणजेच १५ ऑगस्टपर्यंत नियोजित कार्यक्रमाचे आयोजन केले जाणार आहे. यानंतर १६ ऑगस्टपासून नगरपालिका आणि राज्य स्तरावर कार्यक्रम आयोजित केले जातील. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी ३० ऑगस्ट रोजी कर्तव्य पथावरील आझादी का अमृत महोत्सवाच्या समारोपाच्या निमित्ताने एका भव्य कार्यक्रमाला संबोधित करणार आहेत. या कार्यक्रमात ७ हजार ५०० गावातील माती खास कलशात आणली जाणार आहे. सरकारने ‘एक भारत, श्रेष्ठ भारत’ या भावनेने दिल्ली आणि ७ हजार ५०० गावांमध्ये देशी आणि स्थानिक वनस्पतींचे उद्यान उभारण्यासाठी ‘अमृत वाटिका’ योजना सुरू केली आहे. ‘मेरी माटी, मेरा देश’ या अभियानांतर्गत देशासाठी प्राणांची आहुती देणाऱ्या शूरवीर आणि स्वातंत्र्यसैनिकांच्या स्मरणार्थ ग्रामपंचायतींमध्ये ‘शिलाफलकम’ स्मृती फलकही लावण्यात येणार आहेत. ‘हर घर तिरंगा’ अभियानाच्या यशानंतर सरकारने आझादी का अमृत महोत्सव अंतर्गत एक महत्त्वाकांक्षी सहभागात्मक कार्यक्रम आणला आहे. १२ मार्च २०२१ रोजी स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवाला सुरुवात झाली. शूरवीरांना श्रद्धांजली, ‘मिट्टी का नमन’ आणि ‘वीरों का वंदन’ हे ‘मेरी माटी, मेरा देश’ या अभियानाचे मुख्य घटक आहेत. गावात एक युद्ध स्मारक असेल, ज्यामध्ये सशस्त्र दल, निमलष्करी दल आणि पोलिसांच्या शहीदांची नावे कोरली जातील. ज्यामध्ये लोक मातीचे दिवे धरून सेल्फी अपलोड करू शकतात. हे कार्यक्रम स्वातंत्र्य दिनापर्यंत चालणार आहेत. कार्यक्रम प्रसंगी प्रल्हादराव बोराडे पंजाबराव बोराडे राजेश जी मोरे गणेशराव खवणे कैलास बापू बोराडे पंचायत समितीचे माजी उपसभापती नागेशी घारे मंठ्याच्या तहसीलदार रूपा चित्रक मॅडम गटविकास अधिकारी गगन बोने साहेब पाणीपुरवठा अभियंता गाजी साहेब कार्यकारी अभियंता शिंदे साहेब जिल्हा परिषद चे अभियंता सुगंधे तसेच सर्व प्रशासकीय अधिकारी गजानन जी देशमुख दारासिंग चव्हाण विश्वनाथ सिंग चंदेल गणेशराव कापकर माजी पंचायत समिती सदस्य दतराव कांगणे वडगाव चे माजी सरपंच रामकिसन बोडके नितीन सरकटे पत्रकार केशवराव येऊल प्रकाश जी भावसार अशोक राठोड गोवर्धन सिंग चव्हाण मधुकर सरकटे रामेश्वर सरकटे किशोर हनवते शरद सरकटे शशिकांत सरकटे किशोर सरकटे सुधाकर सरकटेश्री शरद पाटील भगवानराव देशमुख कानडीचे सरपंच सुनीलराव खंदारे राजू खंदारे कृष्णा खंदारे बबन खंदारे जगनराव खंदारे जिल्हा परिषद शाळेचे सर्व मुख्याध्यापक व शिक्षक वृंद तसेच इतर अधिकारी उपस्थित होते.

 

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *