पंतप्रधानांच्या मेरी माटी मेरा देश अभियानाला गावकऱ्यांचा उस्फुर्त प्रतिसाद

Khozmaster
1 Min Read

तालुका प्रतिनिधी दत्ता हांडे देऊळगाव राजा  स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून , समर्थ कृषी महाविद्यालयात शिकत असलेल्या विद्यार्थ्यांकडून , ग्रामीण कृषि कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत सिनगाव जहागीर येथे भारताचे पंतप्रधान मा. नरेन्द्र मोदी यांनी घोषणा केलेला मेरी माटी मेरा देश* हा उपक्रम राबविण्यात आला कार्यक्रमास देऊळगाव राजा चे विस्तार अधिकारी मा.माधवराव बाहेकर

ग्रामसेवक मा.मांटे

सरपंच सौ सुनीता डोईफोडे , गावातील इ. मंडळी तसेच समर्थ कृषी महाविद्यालयाचे विद्यार्थी यांनी आपली उपस्थिती नोंदवली. अभियानांतर्गत बाहेकर साहेब व महिला सदस्यांचा हस्ते वृक्षारोपणाचा कार्यक्रम घेण्यात आला . तसेच माजी सैनिकांनाचे स्वागत व अमर जवानां ना श्रद्धांजली देऊन कार्यक्रमाची सांगता झाली. ह्या कार्यक्रमाला समर्थ कृषी महाविद्यालयाचे विद्यार्थी ऋषीकेश ग.मापरी, शैलेश कोरडे , शिवम् गणेश नवले , अथर्व वि.लांबट, प्रतीक आ. लोढे , ,मोहित किनाके, शिवराज खरात व इतर विद्यार्थी हजर होते. हा कारेक्रम प्रा .डॉ नितीन महेत्रे, रावे समन्वयक मोहजितसिंग राजपूत व राष्ट्रीय सेवा योजनेचे समन्वयक किरण ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम राबविण्यात आला.

 

0 9 4 8 1 9
Users Today : 59
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *