गजानन माळकर जालना जिल्हा प्रतिनिधी मंठा. छत्रपती संभाजी महाराज चौक पासुन सुरवात करुन घारे कॉलनी ते बस स्टँड पर्यंत नेण्यात आली. या तिरंगा रॅलीमध्ये हर घर तिरंगा,बेटी बचाव बेटी पढाव सामाजिक, वैज्ञानिक व निसर्गाचे जतन कसे करावे या विषयाचे फलक मुलांनी हातात घेऊन मंठा वासीयांना एक संदेश देण्याचा प्रयत्न केला. आणि हीच गोष्ट या फेरीत आकर्षक ठरली. तसेच विद्यार्थ्यांनी प्रभात फेरीमध्ये भारत माता की जय, वंदे मातरम!, गंगा का धो धो पाणी, हम बच्चे हिंदुस्तानी अशा घोषणांनी हा पूर्ण परिसर गजबजुन गेला. या तिरंगा रॅली मध्ये इयत्ता नर्सरी ते सहावीच्या विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदविला व शाळेमध्ये ध्वजरोहन करून अनेक कार्यक्रम घेण्यात आले या मध्ये विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले शाळेचे मुख्याध्यापक उध्दव मोरे सर यांनी अध्यक्षयी भाषण करताना स्वातंत्र्याचे महत्त्व विद्यार्थ्यांना समजून सांगितले यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून अंबादास काका जाधव,सुखदेवराव मोरे सतीश कासट यांची प्रमुख उपस्थिती होती सूत्रसंचालन प्रा गोपाल जाधव सर यांनी केले तर आभार प्रदर्शन अर्चना राठोड यांनी केले यावेळी अनेक पालक उपस्थित होते कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी कोंडीभाऊ शेंडगे सर,सिमा निर्वळ, भारती गुजर,रंगारे मॅडम,सुनीता वर्मा,राजेश मोरे,राम चव्हाण, अजय कदम,शिवाजी पौंळ,रघु मगर,उध्दव सागळे.यांनी अथक परिश्रम घेतले…